flood in mhalungi river esakal
नाशिक

Nashik Monsoon Update: पश्चिम पट्ट्यातील पावसामुळे म्हाळुंगी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ! शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

Monsoon Rain Update : वरूण राजाने हजेरी लावल्यामुळे म्हाळुंगी नदीचे पाणी भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे.

प्रकाश शेळके

नांदूर शिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून चांगल्या प्रकारे वरूण राजाने हजेरी लावल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या म्हाळुंगी नदीचे पाणी भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे. (Monsoon rain Update Mhalungi river water level increased)

मंगळवार व बुधवार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे डोंगरदऱ्यातील सर्वच बंधारे व नद्या भरल्यामुळे सदरचे पाणी आता भोजापुर धरणाकडे प्रवाहित होत आहे. दोन ते अडीच महिन्यापासून भोजापुर धरणात फक्त मृतसाठा शिल्लक राहिला होता.

त्यामुळे यावरती अवलंबून असलेल्या पाच गाव सोळा गाव पाणीपुरवठा योजना शेवटच्या टप्प्यात येऊन थांबल्या होत्या. मात्र आता सुरू झालेल्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून अशाच प्रकारे पश्चिम पट्ट्यांमध्ये पाऊस सुरू राहिल्यास आठ ते दहा दिवसांमध्ये भोजापुर धरण उसंडून वाहील, असा अंदाज आहे. (latest marathi news)

शेतकरी वर्गामध्ये पूर्णत: नाराजीचे सूर उमटले होते. पण बुधवारी रात्री भोजापुर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे आता शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. या भागामध्ये यावर्षी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन सारखे पीक घेतलेले असून ती वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र आता तीन ते चार दिवसापासून थोड्या कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या अशा पल्लवी झाल्या आहे. भोजापुर धरणामध्ये येणारे पाणी त्यामुळे आता शेतकरी वर्गांना वरदान ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT