Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : अमृतधाम चौफुली येथे घंटागाडीखाली सापडून मोपेडस्वार महिला प्राध्यापिका ठार

Accident News : मयत महिला ही के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून, याप्रकरणी संशयित घंटागाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे पाठीमागून आलेल्या घंटागाडीने मोपेडला जोरदार धडक दिली असता, मोपेडस्वार महिला रस्त्यावर पडली आणि घंटागाडीच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने तिचा करूण अंत झाला. मयत महिला ही के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून, याप्रकरणी संशयित घंटागाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik accident death at Amrutdham Chaufuli marathi news)

प्रा. विनिता रामचंद्र कुयटे (२७, रा. मखमलाबाद रोड) असे मयत मोपेडस्वार महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शनिवारी (ता. २४) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

प्रा. विनिता कुयटे या त्यांच्या मोपेडवरून (एमएच १५ डीजी १२६१) शनिवारी (ता.२४) सकाळी सरस्वती नगर परिसरात असलेल्या के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाल्या. महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिली. (Latest Marathi News)

या अपघातात त्या मोपेडवरून खाली पडल्या आणि घंडागाडीच्या चाकाखाली सापडल्या. घंटागाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

मयत प्रा. कुयटे यांनी डोक्यात हेल्मेटही घातलेले होते. कुयटे या अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घंटागाडी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT