Java Plum esakal
नाशिक

Nashik News : सफरचंदापेक्षाही महागली जांभळे! उत्पादन घटल्याने 200 रुपये किलोला भाव

Nashik News : लांबट आणि गोल आकाराची चवीला आंबट गोड व आरोग्यदायी रसरशीत अशी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : लांबट आणि गोल आकाराची चवीला आंबट गोड व आरोग्यदायी रसरशीत अशी जांभळे बाजारात दाखल झाली आहेत. यंदा उत्पादन घटल्याने सध्या बाजारात जांभळाची आवक कमी आहे. त्यामुळे एक किलो जांभळासाठी २०० रुपये असा भाव आहे. सफरचंदापेक्षाही जांभळे महागली आहेत. १८० रुपये किलोने सफरचंद विकले जात आहे. (More expensive Java Plum than apples)

त्यामुळे ग्राहकही जांभूळ खरेदी करताना आखडता हात घेत आहे. पिंपळगाव शहरातील निफाड फाटा, बसस्थानक, चिंचखेड चौफुली या भागांत जांभळे विक्रीसाठी आली आहेत.

उन्हाळा संपत आला की जांभळाची आवक सुरू होते. डोंगरची मैना, रानमेवा म्हणूनही जांभळाची ओळख आहे. जांभळे विक्रीसाठी दाखल झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जांभळाचे भाव दुपटीने वाढले आहेत. (latest marathi news)

यंदा ते दोनशे रुपये किलोने विकले जात असल्याने तीव्र उन्हात जांभळाचा फुलोरा जळून गेल्याने आवक घटल्याचा हा परिणाम असल्याचे बाळासाहेब दवंगे या विक्रेत्यांनी सांगीतले.

आरोग्यदायी जांभूळ

दरम्यान, पावसाळ्याच्या सुरवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण आरोग्य चांगलं ठेवू शकतो. जांभळामधील काही गुणधर्मामुळे ब्लड शुगर, रक्तातील साखर नियंत्रणात येते. डोळेदेखील चांगले राहतात. व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय अॅन्टी ऑक्सिडंट असते. जांभळात कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT