MP Dr. Shobha Bachhav esakal
नाशिक

Nashik News : रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा मानस; खासदार डॉ. शोभा बच्छाव

Nashik News : आजपर्यंत जे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत, ते मार्गी लावण्याचा माझा मानस असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाताशी घेऊन माझ्यावर जो विश्‍वास दर्शविला, त्याबद्दल मतदारांचे मी देणे लागते. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य व रस्ते हे महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच अधिकाधिक कामे मार्गी लावताना आजपर्यंत जे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत, ते मार्गी लावण्याचा माझा मानस असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले. (MP Dr. Shobha Bachhav statement Intention to clear stalled projects)

सोमवारी (ता. १७) सायंकाळी खासदार डॉ. बच्छाव यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्या वेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी खासदार डॉ. बच्छाव व त्यांचे पती डॉ. दिनेश बच्छाव यांचे स्वागत केले. या वेळी खासदार डॉ. बच्छाव यांनी त्यांच्या नगरसेवक, महापौर, आमदार, राज्यमंत्री व आताच्या खासदारपदाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.

महापौर असताना नाशिक शहरातील महत्त्वाचे प्रकल्प, महापालिकेतील नोकरभरती व १६०० ते १७०० छोटी-मोठी कामे मार्गी लावल्याचे नमूद केले. इच्छा नसताना केवळ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या शब्दाखातर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात इच्छा नसताना मिळालेली उमेदवारी.

प्रचारासाठी मिळालेल्या अवघ्या ४५ दिवसांत मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देताना झालेली दमछाक, प्रचारादरम्यान जाणवलेल्या गावागावांतील समस्या व इतर अनुभवांबाबत डॉ. बच्छाव दाम्पत्याने मनसोक्त गप्पा केल्या. डॉ. बच्छाव यांची प्रतिमा, पक्षीय तसेच विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते-कार्यकर्त्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, तसेच एखादे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची चिकाटी. (latest marathi news)

भारतीय जनता पक्ष तसेच विद्यमान खासदारांबद्दल असलेली नाराजी विजयापर्यंत कशी घेऊन गेली, याविषयी त्यांनी सांगोपांग चर्चा केली. संपादक तसेच संपादकीय सहकाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना खासदार डॉ. बच्छाव म्हणाल्या, की मतदारसंघातील सर्वांत बिकट असलेली पाणी समस्या सोडविण्याला अग्रक्रम देणार असून, त्यानंतर वीज.

शिक्षण, आरोग्य, रस्ते या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर भर देणार आहे. याबरोबरच मनमाड- धुळे-इंदूर रेल्वेमार्ग, सुळवाडे- जामफळ उपसा सिंचन योजना व माजी खासदारांच्या काळात अपूर्णावस्थेत राहिलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करेन, असा विश्‍वासही खासदार डॉ. बच्छाव यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT