Dirty tap water esakal
नाशिक

Nashik News : रायगड चौकात गढूळ, अळीयुक्त पाणीपुरवठा; नागरिकांकडून तीव्र संताप

Nashik : रायगड चौक भागात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच गढूळ पाण्यात आळ्या आढळून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : रायगड चौक भागात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच गढूळ पाण्यात आळ्या आढळून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याबाबत महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना सांगूनही समस्या जैसे थे आहे. (Muddy maggot infested water supply in Raigad Chowk )

प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने महिलांना संताप व्यक्त केला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यात अक्षरश अळी निघत आहेत. सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना पाणी पिणेदेखील मुश्कील झाले आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, हे दूषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारीदेखील पडले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीवदेखील जाऊ शकतो. अनेक दिवसांपासून असे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.

या संदर्भात बऱ्याच वेळा तक्रारी दिल्या, परंतु अधिकारी फक्त उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे नागरिकांनी सांगितले . महिलांना तीन ते चार वेळेस पाणी गाळून घ्यावे लागते. तरीदेखील पाणी पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरले तर याला जबाबदार कोण, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. यावर मनपा प्रशासनाने ठोस कारवाई करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. (latest marathi news)

महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा

या संदर्भात पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सिडको शिवसेना विभाग योगेश गांगुर्डे यांनी सांगितले की, पावसाने हजेरी लावताच शहरात ठिकठिकाणी गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येने अधिक उग्र रूप धारण केले आहे. पावसाळ्यात जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणासाठी क्लोरिनेशन वाढवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

यावर तोडगा जर निघाला नाही तर येत्या दोन दिवसात महापालिकेसमोर हेच पाणी घेऊन आंदोलन करू असे सांगितले. गेल्या अनेक महिन्यापासून सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळित झालेला आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, गढूळ पाणीपुरवठा होणे, अंबड वजन काटा परिसरामागे पाच पाच दिवस पाणी न येणे आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT