Panchvati Division, dangerous mansions,  esakal
नाशिक

Nashik NMC : पंचवटीत धोकादायक वाडे, घरमालकांना नोटिसा!

Nashik News : महापालिका प्रशासनाकडून जवळपास २०३ धोकादायक घर व वाडेमालकांना व ७१ पूररेषेतील घरमालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्यात धोकादायक घरे संबंधित मालकांनी दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी दिल्या जातात. या वर्षी जवळपास २०३ धोकादायक घर व वाडेमालकांना व ७१ पूररेषेतील घरमालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. मूळ मालकांनी दखल न घेतल्यास नळजोडणी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. (Municipal administration has issued notices to dangerous houses and landlords)

याशिवाय महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनपा पंचवटी विभाग अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत धोकादायक व अतिधोकादायक घरामध्ये राहत असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहे.

त्या पार्श्वभूमीवर विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांनी पंचवटीतील मखमलाबाद, आडगाव, म्हसरूळ, नांदूर मानूर तसेच पंचवटी गावठाण भागातील जवळपास २०३ धोकादायक घरांची पाहणी केली व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. (latest marathi news)

तसेच ७१ पूररेषेतील घरमालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात दरवर्षी धोकादायक घर मालकांना नोटिसा बजावल्या जातात. धोकादायक घरांचा भाग काढून घ्यावा किंवा दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र संबंधित मूळ घर मालक याकडे दुर्लक्ष करीत महापालिकेच्या नोटिशीला दाद देत नाही.

यंदा पालिकेच्या आदेशाची पायमल्ली होऊ नये, यासाठी संबंधितांनी दखल न घेतल्यास पालिका प्रशासन आठवडाभर वाट बघणार व त्यानंतर संबंधितांची नळ जोडणी, वीजपुरवठा खंडित करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT