Water Cut in Nashik 
नाशिक

नाशिककरांसाठी गुड न्युज! एक दिवसाची पाणीकपात मागे

विक्रांत मते

नाशिक : गंगापूर सह मुकणे व दारणा धरण परिसरात पावसाची संततधार असल्याने समाधानकारक पाणी साठा तयार झाला आहे त्यामुळे आठ दिवसातून अमलात आणली जाणारी पाणी कपात मागे घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले.

शहराला पाणी पुरवठा करणाया गंगापूर धरण समुह, मुकणे व दारणा या धरणांच्या परिसरात जुलैच्या दुसया आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे महापालिकेने आठ दिवसातून एकदा पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तीन आठवड्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. परंतू गेल्या पंधरा दिवसांपासून धरण परिसरात चांगला पाऊस होत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण एंशी टक्के, मुकणे धरण ५१ टक्के तर दारणा धरणातील पाणी साठा ७८ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. तिनही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नागरिक व लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सुर होता. मराठवाड्याला पाणी सोडले जात असताना नाशिककरांवर पाणी कपात लादली जात असल्याचा आरोप होत होता. शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यासंदर्भात निर्णय घेतील असे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी (ता. २) आयुक्त जाधव यांनी

खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यात पाण्याच्या सद्यस्थितीबद्दल पाणी पुरवठा विभागाच्या अधिकायांनी माहिती दिली. समाधानकारक पाणी साठा असल्याने आठ दिवसातून एकदा म्हणजे दर बुधवारी संपुर्ण दिवस होणारी पाणी कपात तुर्त मागे घेण्याचा निर्णय आयुक्त जाधव यांनी जाहिर केला. ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने ओढ दिल्यास भविष्याचा विचार करून पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतू कपात मागे घेण्यात आली असली तरी नाशिककरांनी पाणी जपुन वापरावे, अनावश्‍यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

गंगापूर, मुकणे व दारणा धरणात पुरेसा पाणी साठा तयार झाल्याने आठ दिवसातून एकदा सुरु करण्यात आलेली पाणी कपात तुर्त मागे घेतली जाणार आहे. नाशिककरांनी अनावशक्य पाण्याचा वापर टाळावा.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT