घडलंय-बिघडलंय - प्रभाग १ sakal
नाशिक

भाजप- सेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेची भूमिका निर्णायक

घडलंय-बिघडलंय - प्रभाग १

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भौगोलिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या नव्याने जाहीर केलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदाही पारंपारिक लढत होणार असली तरी या लढतीतील पहिलवान राजकारणाच्या दुसऱ्या पिढीचे नेतृत्व करणार राहणार आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्येच महत्त्वाची लढत राहणार असल्याचे तूर्त दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळातील द्वितीय महापौर अशोक मुर्तडक या प्रभागातून सातत्याने निवडून येत असले तरी यंदा त्यांची भूमिका काय राहील, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे तूर्त भाजप-सेनेमध्येच थेट लढत होईल, असे चित्र आहे.

अनुसूचित जमातीचे मतदार मोठ्या संख्येने असल्याने या गटातदेखील पारंपारिक लढती होतील. मात्र पाटापासून प्रभागाच्या हद्दी विलग झाल्याने पारंपरिक आदिवासी उमेदवार एक व पाच या दोन प्रभागांमध्ये विभागून समोरासमोर येतील. त्यामुळे या गटातील उमेदवार शोधण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागणार असल्याने उमेदवार आयात झाल्यास आश्‍चर्य वाटण्यासारखे राहणार नाही. मखमलाबाद हा वेगाने विकसित होणारा भाग आहे. याशिवाय मळे विभाग अधिक असल्याने शहरी- ग्रामीण असा संमिश्र स्वभावाच्या मतदारांसमोर जाताना विकास हा मुद्दा महत्त्वाचा तर राहिलंच, त्याशिवाय जातीची समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान आहे. मराठा, वंजारी, आदिवासी, माळी, असे जातीय समीकरण जुळविणारा विजयाच्या पथावर पोहचेल.

ग्रीनफील्ड तारणार की मारणार?

स्मार्टसिटीअंतर्गत साडेसातशे एकरात ग्रीनफील्ड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी विरोध केल्याने प्रकल्प रखडला आहे. अद्याप पूर्णपणे शासनाने या प्रकल्पावर फुली मारलेली नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ग्रीन फिल्ड प्रकल्प रद्द करून आणण्यास मदत होईल. या प्रभागातून गोदावरी व आळंदी कालवा जात असला तरी अद्यापही एकवेळ अपुरा पाणीपुरवठा होतो. आनंदवली नंतर वेगाने विकसित होणारे शिवार असले तरी रस्ते, दिवाबत्ती व आरोग्य सेवेची बोंब आहे. मळे परिसर विकासापासून वंचित असल्याच्या प्रश्‍नाला इच्छुकांना ठोस उत्तर द्यावे लागेल.

यांना हवीय संधी

पुंडलिक खोडे, सुनीता पिंगळे, दामोदर मानकर, ज्ञानेश्‍वर काकड, प्रमोद पालवे, दीपक पिंगळे, मनीष बागूल, वाळू काकड, कल्पना पिंगळे, गोकुळ काकड, अंकुश काकड, मोतीराम पिंगळे, विद्या पिंगळे, सुरेश आव्हाड, महेश शेळके, छाया काकड, प्रा. वैशाली आहेर- कोकाटे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT