Nashik Municipal Corporation election bjp shiv sena news sakal
नाशिक

Nashik Municipal Corporation|सत्तेची पोलादी भिंत चिरणारा ठरेल जायंट किलर

विकासकामांबरोबरच जनसंपर्क ठरणार महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सहाव्या पंचवार्षिकमध्ये पाचही वर्षे सत्तेची पदे कायम ठेवणाऱ्या एकवरून यंदा दोन क्रमांक झालेल्या या प्रभागात सत्तेची चायनीज पोलादी भिंत चिरणाराच खरा जायंट किलर ठरणार आहे. परंतु एवढा ताकदवर कोणी दिसत नाही. शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षाचा चंचुप्रवेश झाला तरी मोठे यश पदरात पडणार आहे. (Nashik Municipal Corporation Election News)

पहिली अडीच वर्षे रंजना भानसी महापौर राहिल्या. पुढची दोन वर्षे गणेश गिते स्थायी समितीचे सभापती, तर शेवटच्या टप्प्यात का होईना अरुण पवार यांची गटनेतेपदी नियुक्त करून बंडखोरीचा आवाज दाबण्यात भाजपला यश आले. एवढी मोठी सत्तेची पोलादी भिंत उभी राहिली असताना ही भिंत चिरून भाजपच्या बालेकिल्ल्यात आव्हान निर्माण कोण करणार, असा प्रश्‍न सध्या आहे. यात वैशिष्ट म्हणजे भानसी- पवार या जोडगोळीच्या गेल्या पंचवीस वर्षांपासून या प्रभागात राबता आहे. दोघांनी निर्माण केलेली जातीय समीकरणे, या समीकरणांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदिवासी भागातील संपर्काची प्राप्त झालेली झालर यासारख्या बारीकसारीक गोष्टींचा विचार केल्यास अन्य पक्षासमोर ही समीकरणे मोडण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

गणेश गिते यांची साम-दाम-दंडाची ताकद मिळणार असल्याने अन्य पक्षासाठी आव्हान अधिकच अवघड आहे. २०१७ च्या निवडणुकीत चार नगरसेवक होते. यंदा तीन नगरसेवक राहतील. भानसी, पवार, गिते ही त्रिसूत्री सध्या तरी निश्‍चित आहे. प्रभागाच्या रचनेचा विचार करता म्हसरूळ गावचा भाग आडगाव ला जोडला गेल्याने विद्यमान नगरसेवकांना अधिक सोयीचे झाले आहे. अन्य पक्षाच्या तुलनेत भाजपची ताकद असली तरी शिवसेनेने या प्रभागात धडका मारण्याचे थांबविलेले नाही. कुठे ना कुठे या पोलादी भिंतीला तडा जाऊन चंचुप्रवेश झाला तरी मोठा विजय असेल. मात्र हा खेळ उमेदवारी कोणाला मिळेल, यावर अवलंबून राहील.

विकासाबरोबरच जनसंपर्क ठरेल महत्त्वाचा

नव्याने अस्तित्वात आलेल्या या प्रभागात विद्यमान नगरसेवकांकडून विकास हा मुद्दाच चर्चेला जाणार आहे. पाच वर्षात अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडिअमपासून रुग्णालय व उड्डाणपुलांसाठी आर्थिक तरतूद येथपर्यंत कामांची यादी सांगता येईल. त्यामुळे इच्छुकांचा जनसंपर्कावर भर राहील. जनसंपर्क हाच मुद्दा प्रचाराचा असेल.

हे आहेत इच्छुक

  • रंजना भानसी, अरुण पवार, गणेश गिते, अमित घुगे, रेखा नेहरे, भाऊसाहेब नेहरे (भाजप)

  • वंदना पेलमहाले, गणेश पेलमहाले, आकाश कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • डॉ. सचिन देवरे, विशाल कदम, प्रवीण जाधव (शिवसेना)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT