Nashik Municipal Corporation Election Ward division news  
नाशिक

नाशिक : लष्कराच्या देखरेखीखालील प्रभागात ‘मनी’ भाईंचे वर्चस्व

भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रभाग ३० आणि ३१ चे विभाजन करून प्रभाग ४० हा नव्याने इंदिरानगर परिसरात वाढला आहे. मोठ्या संख्येने असलेली झोपडपट्टी आणि पांडवनगरी भागात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या नागरिकांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रभागात कोणा एका पक्षाची मक्तेदारी राहणार नसून ‘मनी पॉवर’वर येथील निवडणूक लढली जाणार आहे.

नवीन वडाळा गाव भागातील सावित्रीबाई फुले वसाहत, म्हाडा वसाहत, मेहबूबनगरमधील गल्ली एक ते चार, पिंगूळबाग वसाहत, अण्णा भाऊ साठेनगर येथील मोठ्या संख्येने असलेले मतदार कुणाचेही बांधिल नाहीत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन या मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या भागासह येथे समाविष्ट असलेल्या लष्कर हद्दीतील मतदार भाजपचा कोअर वोटर आहे. तसेच पिंपळगाव खांब मळे भागातील मतदारही वाढले आहेत. येथे भाजपला चांगली संधी असू शकते. मात्र, शिवसेनेलाही येथे पूर्वी संधी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कडवी लढत दिली जाईल. संपूर्ण प्रभागात जाणकारांच्या मते ११ मनी पॉवरच्या दृष्टीने हॉटस्पॉट असून, या ठिकाणी ज्याची ताकद जास्त लागेल, तोच विजयी होईल, असे चित्र आहे.

भाजपची शेजारच्या प्रभागांमधील स्पर्धा लक्षात घेता विद्यमान एखाद्या नगरसेवकाचे येथे पुनर्वसन होऊ शकते. एखादा पक्ष मुस्लिम चेहराही पुढे करू शकतो. झोपडपट्टी भागात राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही येथे जोरात असणार आहे. झोपडपट्टीमधील समस्या, येथील वाढणारी गुंडगिरी, या ठिकाणी असलेली अनधिकृत गुदामे, वीज व पाणीचोरी, अशा अनेक समस्यांनी या प्रभागाला ग्रासले आहे. दुसरीकडे नव्याने विकसित होणाऱ्या मोठ्या गृह प्रकल्पांमुळे या भागात अनेक सुविधा होण्यास मोठा वाव आहे. नव्यानेच प्रभाग झाल्याने येथे इतर इच्छुकांची एवढी संख्या नाही.

प्रभागाची व्याप्ती

मेट्रो झोन परिसर, गुरू गोविंदसिग कॉलेज, सिमेन्स कॉलनी, सेंट जार्जेस चर्च गुलशननगर, केंद्रीय विद्यालय.

  • उत्तर : श्रीराम चौकापासून श्री छत्रपती चौकापर्यंत. तेथून रस्ता ओलांडून ३० मीटर डीपी रस्त्याने वडाळा चौफुलीपर्यंत. तेथून पुढे मिलटरी हद्दीने नाशिक- पुणे रस्त्यापर्यंत.

  • पूर्व : नाशिक- पुणे महामार्गावरील मिलिटरी हद्दीपासून नाशिक-पुणे महामार्गाने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन उपनगर नाका एमएसईबी कार्यालय घेऊन मिलिटरी हद्दीने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन आर्टिलरी सेंटरच्या पूर्वेकडील गेटपर्यंत व तेथून आर्टिलरी सेंटरच्या हद्दीतील रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन वालदेवी नदीपर्यंत.

  • दक्षिण : वालदेवी नदीने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन वडनेर वालदेवी पुलापर्यंत व तेथून उत्तरेकडील मिलिटरी हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन व तेथून पश्चिमेकडे मिलिटरी हद्दीने उत्तरेकडील भाग घेऊन पिंपळगाव- वडाळा शिवेवरील मिलिटरी हद्दीपर्यंत. तेथून १८ मीटर रस्त्याने वडाळा-पाथर्डी रस्त्यापावेतो. तेथून गुरू गोविंदसिंग कॉलेजपर्यंत. तेथून समोरील १८ मीटर रस्त्याने सत्यम अपार्टमेंटसमोरील १८ मीटर रस्त्यापर्यंत.

हे आहेत इच्छुक

सुप्रिया खोडे, ॲड. श्‍याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, ॲड. अजिंक्य साने, गणेश जाधव, नीलेश साळुंखे, देवानंद बिरारी, रशिदा शेख, प्रशांत बडगुजर, अनिकेत सोनवणे, संदीप जगझाप, विनोद दळवी, सुनील देसाई, योगेश दिवे, वसीम शेख, रमीझ पठाण, वैशाली दळवी, डॉ. दीपिका जगझाप, संकेत खोडे, शिल्पा सोनार, उदय बडोदे, राम बडोदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT