nashik municipal election ward number 11 reservation politics kgm00 
नाशिक

नाशिक महापालिका : स्थानिक-उपरा वादाला खतपाणी

गुन्हेगारीसह औद्योगिक वसाहतीवरील वर्चस्व ठरणार महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : औद्योगिक वसाहतीसह ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात यंदाही स्थानिक-उपरा वादाला खतपाणी घातले जाण्याचीच शक्यता आहे. त्याशिवाय बालेकिल्ले मजबूत ठेवता येणार नाहीत, हा आतापर्यंतचा अनुभव येथील नागरिकांचा आहे. पाच वर्षे वातावरण शांत असले, तरी निवडणुकीत हा वाद मुद्दामहून उकरून काढला जातो. त्यामुळे मतदार स्थानिक-उपरा वादाला खतपाणी घालणार की विकासाला मतदान करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रभागात पिंपळगाव बहुला गावाचे महत्त्वाचे मतदान आहे. या गावातील मतदार जो नगरसेवक ठरवतील तोच उमेदवार विजयी ठरतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे नगरसेवक ठरविण्याचा मान या गावाला पुन्हा एकदा मिळणार आहे. या गावाबरोबरच परिसरात वाढलेली गुन्हेगारी यंदा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. मागील निवडणुकीत या प्रभागातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली. मात्र, यंदा विद्यमान नगरसेवकांच्या पाठीशी मतदार उभे राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे राहील. विद्यमान नगरसेवक निवडून आल्यास व्यक्तीकेंद्रित निवडणूक झाल्याचे स्पष्ट होईल. मात्र, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विद्यमान पक्षातील इच्छुक वेगवेगळ्या पक्षांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक-उपरा वाद या भागाच्या पाचवीला पूजला आहे. मात्र, निवडणूक आली तरच हा वाद उफाळून येतो वा आणला जातो. बाकीची पाच वर्षे या वादाचा संबंध येत नाही. निवडणूक आली, की या वादाचा हत्यार म्हणून दोन्ही बाजूंनी वापर होतो.

प्रभागाची व्याप्ती ः पिंपळगाव बहुला, विश्वासनगर, सातमाऊली चौक, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, संभाजीनगर.

  • उत्तर : महापालिका हद्दीपासून गंगापूर- पिंपळगाव शिवेने पूर्वेकडे दक्षिणेकडील महापालिका जलशुद्धीकरण केंद्रापासून पिंपळगाव बहुला सर्व्हे क्रमांक १८९ च्या पूर्व हद्दीपासून नियोजित ३० मीटर. विकासयोजना रस्त्याने दक्षिणेकडून शिवशंकर अपार्टमेंट. पूर्वेकडे १८ मीटर रस्त्याने दक्षिणेकडील भाग घेऊन महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनी गेटसमोरील पार्थ पॅलेस हॉटेलपर्यंत.

  • पूर्व : महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनी गेटसमोरील पार्थ पॅलेस हॉटेलपासून संत नरहरी मार्गाने दक्षिणेकडे, पश्चिमेकडील भाग घेऊन प्रगती विद्यालयाचा परिसर व समृद्धीनगर वगळून पश्चिमेकडील भाग घेऊन हॉटेल अमृत गार्डनसमोरील विठ्ठल मंदिरापर्यंत. तेथून त्र्यंबकेश्वर रस्ता ओलांडून हॉटेल अमृत गार्डन पश्चिम हद्दीने नंदिनी नदीपर्यंत.

  • दक्षिण : नंदिनी नदीजवळील हॉटेल अमृत गार्डन पश्चिम हद्दीपासून (अमृत गार्डन वगळून) नंदिनी नदीच्या डाव्या तीराने उत्तरेकडील भाग घेऊन पिंपळगाव बहुला सर्वे क्रमांक १४५ च्या पश्चिम हद्दीपर्यंत.

  • पश्चिम : पिंपळगाव बहुला सर्वे क्रमांक १४५ च्या पश्चिम हद्दीपासून उत्तरेकडे महापालिका हद्दीने पूर्वेकडील भाग घेऊन गंगापूर, पिंपळगाव बहुला शिवेपर्यंत.

इघे खून प्रकरणाचे पडसाद

या प्रभागाला गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याने साम, दामबरोबरच दंडाची ताकद महत्त्वाची ठरते. भाजपचे सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाला होता. त्याचे राजकीय पडसाद अद्यापही उमटत असल्याने येत्या निवडणुकीत ही बाब प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवरचे वर्चस्व ही गुन्हेगारी वृत्तीची मुख्य पार्श्‍वभूमी मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: - नेस्को ड्रग्स प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT