NMC
NMC esakal
नाशिक

पूर्व पावसाळी कामांना वेग

विनोद बेदरकर

नाशिक : पावसाळ्यात गटारी चोकअप होऊन जागोजागी पाणी साचते. त्यामुळे गटारीच्या स्वच्छतेची कामे सुरू झाली आहेत. त्यानुसार शहरात ९२ हजार ७७१ मीटर लांबीच्या गटारींची सफाई ढापे काढून पाइपलाइन स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने शहरातील ६ ही विभागांत पावसाळापूर्व कामे सुरू केली आहेत. बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहे. आतापर्यंत पावसाळी नाला सफाई कामे पूर्ण झाली आहेत. एकावेळी आरसीसी पाइप गटारांवरील १३ हजार ९४६ चेंबरची सफाई आणि दुसरीकडे गटार अशा दोन्हींच्या सफाईला वेग आला आहे.

नाशिक पूर्व २९५७, पश्चिम ३४०९, पंचवटी १३५३, नाशिक रोड १०५३, सिडको २२७५, तर सातपूर विभागात २९९० चेंबर आहे. पावसाळी नाला सफाईची ५०९२६ मिटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व ३१५०, पश्चिम ८९०, पंचवटी १८१११, नाशिक रोड १२२००, सिडको ८७१०, सातपूर ७८६५, मिटर लांबीची साफसफाई करण्यात आली. तर, तर पावसासाठी खुल्या गटारींची ५८०४८ मिटर लांबीच्या गटारींची साफसफाई करण्यात आली. त्यात नाशिक पूर्व १४११५, पश्चिम ९४०, पंचवटी ८९७०, नाशिक रोड १६२७८, सिडको १४७१३, सातपूर ३०३२ मिटर लांबीच्या गटारी आहेत.

खुल्या गटारीचे काम पूर्णत्वास

खुल्या गटार योजनेतील कामेही पूर्णत्वास आली आहेत. शहरात ९२ हजार ७७१ मीटर लांबीच्या गटारींची सफाई पूर्ण करण्यात आली असून, पावसाळी गटार योजनेतील ढापे काढून पाइपलाइन स्वच्छ करण्यात आली आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड सर्वच भागांतील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आयुक्त रमेश पवार यांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. विभागीय अधिकाऱ्‍यांना सूचनाही केल्या. या वेळी विभागनिहाय पथके तयार ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील सराफ बाजार भागात नेहमी पाणी साचते. याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्याचीही दखल घेण्याच्या सूचना आल्या आहेत.

विभाग पावसाळी गटारी (लांबी) साफ करणे बाकी खुल्या बांधकाम गटारी साफ करणे बाकी

नाशिक पूर्व १८०६८ (मिटर) १४११५ (मिटर) ८७६० (मिटर) ५३५५ (मिटर)

नाशिक पश्चिम ९४० ६७० ४६२ २०८

पंचवटी ३५४९० ८९७० ८९७० ००

नाशिक रोड १६२७८ १६२७८ १४०७८ २२००

सिडको १८५९३ १४७१३ ८६२१ ६०९२

सातपूर ३४०२ ३०३२ २१३५ ८९७

एकूण शहर ९२७७१ ५७७७८ ४३०२६ १४७५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT