Ramtirtha esakal
नाशिक

Nashik NMC News : पार्किंगच्या जागेसाठी मनपाकडून रामतीर्थावरील जागेचे भूसंपादन!

Nashik News : रामतीर्थावरील पार्किंगसाठी आरक्षित भूखंड उच्च न्यायालयाचा आदेशानंतर महापालिकेने संपादित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रामतीर्थावरील पार्किंगसाठी आरक्षित भूखंड उच्च न्यायालयाचा आदेशानंतर महापालिकेने संपादित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महापालिकेतर्फे आरक्षित जागांचे भूसंपादन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून उच्च न्यायालयाने न्यायनिवाडा केलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीस टक्के रक्कम भरून संपादित केले जात आहेत. पार्किंगसाठी जागेची गरज काहीअंशी यामुळे भागणार आहे. (Nashik NMC land acquisition marathi news)

नाशिक शिवारात निळ्या पूररेषेत असलेल्या रामकुंड येथील सर्वे क्रमांक ३११ पै. सि.स.नं. ५७४५ मधील आरक्षण क्रमांक १६१ पार्किंगसाठी ८०२० चौरस मीटर क्षेत्र संपादनाचा प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात आला. त्यासाठी दहा कोटी रुपये देण्याची तयारी दाखविण्यात आली. निळ्या पूररेषेत जागा असल्याने ५० टक्के मोबदला देण्याचा सल्ला नगररचना मूल्य निर्धारण कक्षाने दिला. (latest marathi news)

जागेसंदर्भात २०१८ मध्ये दावा दाखल झाला. त्याचदरम्यान शहर विकास आराखडा तयार केला गेला. पूररेषेत जागा येत असल्याने आरक्षण वगळणे गरजेचे होते. उच्च न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतरही पूररेषेत असल्याने जागा बांधकाम योग्य नसल्याचे महापालिकेतर्फे कळविले गेले नाही.

"आरक्षित जागेवर बांधकाम करणे शक्य नाही. परंतु, उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कारवाई होवू शकते. तसेच पार्किंगसाठी जागेची गरज आहे."

- हर्षल बाविस्कर, उपसंचालक, नगररचना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT