nashik municipal corporation 
नाशिक

एलबीटी गैरव्यवहार महासभेत गाजणार! चौकशीचा प्रस्ताव सादर

विक्रांत मते

नाशिक : स्थानिक संस्था कर अर्थात, एलबीटी करप्रणाली बंद होऊनही महापालिका कर्मचाऱ्यांकडून ६५ हजार निर्धारित प्रकरणांच्या माध्यमातून उद्योजकांना नोटीस बजावून लूट केली जात असल्याच्या प्रकाराला आता थेट महासभेतच जाब विचारला जाणार आहे. सभागृहनेते सतीश सोनवणे व भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी चौकशीचा प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे. 

काय आहे प्रकरण?

एलबीटी करप्रणाली रद्द होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कर निर्धारणाची सुमारे ६५ हजार प्रकरणे अद्यापही महापालिकेच्या एलबीटी विभागाकडे प्रलंबित असून, विशिष्ठ उद्योजक, व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून आर्थिक तडजोडीचे प्रकार या विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सुरू केल्याने हक्काच्या साडेसहाशे कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. एलबीटीच्या अनामत रकमेतही गफला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. त्यापाठोपाठ आता भाजपने महासभेवर चौकशीचा प्रस्ताव दिला आहे. २०१५ मध्ये एलबीटी बंद झाल्याने अद्यापही वसुली सुरू असल्याने ही बाब संशयास्पद आहे. महापौर व सभागृहनेते कार्यालयाकडे उद्योजकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या कराव्यात, ही मागणी येत्या महासभेत प्रस्तावाद्वारे केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : रुपाली पाटील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT