Nashik Municipal Corporation Fund  esakal
नाशिक

पथविक्रेत्यांना कर्ज वाटपात नाशिक महापालिका अव्वल

अर्जदारांची संख्या गाठण्यातही महापालिका राज्यात पहिली ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अमलात आणलेल्या आत्मनिर्भर निधी योजनेत नाशिक शहरात सोळा हजार ८८६ पथविक्रेत्यांची नोंद झाली. त्यांना सोळा कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याने राज्यात नाशिक महापालिका कर्ज वाटपात दुसरी ठरली आहे. अर्जदारांची संख्या गाठण्यातही महापालिका राज्यात पहिली ठरली आहे.

कोरोनाकाळात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने पथविक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले होते. या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने पथविक्रेत्यांसाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना राबविली. महापालिकेने २६ हजार ७६० पथविक्रेत्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. कर्जासाठी महापालिकेकडे २१ हजार ३३६ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोळा हजार ७८७ पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर करण्यात आले. एकूण १९ कोटी ४१ लाख रुपये कर्ज मंजूर झाले असून, १४ हजार ८८६ पथविक्रेत्यांना सोळा कोटी १६ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. दहा हजार रुपये कर्जफेड करणाऱ्या पथविक्रेत्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये याप्रमाणे कर्ज देण्यात आले. वीस हजार रुपये कर्जासाठी २६ हजार ३३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी एक ३५७ पथविक्रेत्यांना दोन कोटी ७१ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले.

‘स्वनिधी से समृद्धी' योजनेतर्गत मातृ वंदना, जननी सुरक्षा, पीएम सुरक्षा बिमा, पीएम जीवन ज्योती बिमा, पीएम जन धन, मानधन, वन नेशन वन रेशन कार्ड इमारत व इतर बांधकाम कामगार या आठ योजना आहेत. या आठ योजनेचा लाभ दिला जात आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने तेरा हजार ४५५ पथ विक्रेत्यांचे सोशल इकॉनॉमिक प्रोफायलिंगमध्ये नाशिक महापालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. ५३ हजार ६४२ पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिला. अशी माहिती पालिकेच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT