nashik muncipal corporation esakal
नाशिक

महापालिका काढणार तीनशे कोटींचे कर्ज; महापौरांची घोषणा

विक्रांत मते

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्‍वभूमीवर, दोन वर्षांत विकासकामे न झाल्याचा दावा करत महापौर सतीश कुलकर्णी (mayor satish kulkarni) यांनी अंदाजपत्रक दुरुस्तीसह मंजूर करतानाच विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढण्याची घोषणा केली. त्याचबरोबर स्मार्टसिटी कंपनीची कामे बंद असल्याने विकासकामांसाठी दीडशे कोटीचा परतावा घेण्याचीही घोषणा केली. तर, विकासकामांवर खर्च केल्या जाणाऱ्या १६५ कोटी रुपयांतून प्रभागांमध्ये समप्रमाणात डिसेंबरअखेर कामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. (Nashik-Municipal-Corporation-will-take-loan-of-300-crore)

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापौरांची घोषणा

स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सोमवारी (ता. ३१) सादर केले. प्रशासनाने फेब्रुवारीत दोन हजार ३६१.५३ कोटी रुपयांचे अदांजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात, उत्पन्नाच्या बाजू गृहीत धरून विविध विकासकामांचा समावेश करताना ४०२.२५ कोटी रुपयांची वाढ करत दोन हजार ७६३.८१ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सदस्यांनी केलेल्या विविध सूचनांचा अंतर्भाव करत दुरुस्तीसह हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

विकासकामांसाठी निधीची तरतूद

निवडणुकीचे वर्ष असल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी ३०० कोटींचे कर्ज घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, स्मार्टसिटीची कामे बंद असल्याने एक हजार २०० कोटी शिल्लक असलेल्या रकमेपैकी महापालिकेला दीडशे कोटी रुपये परत घेणे, अतिरिक्त आयुक्तांना असलेल्या आर्थिक मर्यादेच्या अधिकारापर्यंतचे प्रस्तावच सादर करणे, दारणा धरणातून अळी व दुर्गंधीयुक्त पाणी उचलावे लागत असल्याने मुकणे व गंगापूर धरणांत विभागून आरक्षण टाकण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करणे, तसेच शहर विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी १६५ कोटींची विकासकामे ३१ प्रभागांत विभागून देण्याच्या सूचना महापौर कुलकर्णी यांनी दिल्या.

वैद्यकीय विभागाची श्‍वेतपत्रिका

कोरोनाकाळात प्रशासनाच्या कामकाजात अडथळा नको म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी याचा वेगळा अर्थ घेतला. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर वैद्यकीय विभागाच्या खर्चाची श्‍वेतपत्रिका काढण्याची घोषणा महापौर कुलकर्णी यांनी केली.

निवडणुकीचे वर्षे असल्याने भरघोस निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी कर्ज काढण्याची मुभा प्रशासनाला देण्यात आली आहे. अंदाजपत्रकात तरतुतूद करण्यात आलेली सर्व कामे झाली पाहिजेत. - सतीश कुलकर्णी, महापौर

अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून उपयोग नाही. नगरसेवकांची विकासकामे प्रत्यक्षात झाली पाहिजेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. परसेवेतील अधिकाऱ्यांऐवजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळावी. -अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापलिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

DMart New Sale : नवा आठवडा, नवा सेल! डीमार्टमध्ये उद्यापासून स्पेशल ऑफर सुरू, कोणत्या वस्तू मिळणार जास्त स्वस्त? पाहा एका क्लिकवर

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT