nmc esakal
नाशिक

NMC News : निच्चांकी मतदानाच्या केंद्रांवर महापालिकेचे वर्कआऊट; टक्का वाढविण्यासाठी उपाययोजना

NMC : मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

NMC News : मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर दिली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून चाळीस टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या २४ केंद्रांवर उपाययोजना केल्या आहेत. परंतु टक्का वाढविण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना दमछाक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना मतदानाची टक्का वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (nashik Municipal Corporation workout on low polling stations marathi News )

आतापर्यंत जनजागृती करण्यापुरतेच महापालिकेचे काम होते. परंतु ते कामदेखील पूर्ण क्षमेतेने होत नव्हते. परंतु यंदा टक्का वाढविण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार सूचना दिल्या आहेत. महापालिका हद्दीत विधानसभेचे २४ मतदान केंद्रे असे आहेत की त्यावर मागील विधानसभा निवडणुकीत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. यामध्ये मध्य विधानसभा मतदारसंघात सोळा मतदान केंद्रे आहेत.

पूर्व विधानसभा मतदारसंघात सात, देवळाली विधानसभा मतदारसंघात एक मतदान केंद्रे आहेत. पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात सर्वच मतदान केंद्रावर चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. मध्य विधानसभा मतदारसंघात बजरंगवाडी मधील सात मतदान केंद्रावर फक्त १९ टक्के मतदान झाले. २२१ ते २२७ या सात मतदान केंद्रांवर सर्वाधिक निच्चांकी म्हणजे १९ टक्के मतदान झाले..(latest marathi news)

उपनगर भागातील २१० ते २१४ या मतदान केंद्रावर २३ टक्के मतदान झाले. चोवीस मतदान केंद्रावरील मतांचा टक्का साठपेक्षा अधिक असणे प्रशासनाला गरजेचे वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. मतदार जागृती हा त्यातील पहिला पर्याय आहे. मतदारांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.

या मतदान केंद्रांवर लक्ष

- मध्य - २२१ ,२२२,२२३,२२४,२२५,२२६ २२७, २१० ,२११,२१२,२१३,२१४, १४४ ते १४५, ५२, २३०.

- पूर्व - ६३,६९,२०५,२३८,२३९, ३१६,३०७.

- देवळाली - १५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT