नाशिक

स्वीकृत साठी 21 ऑक्टोबर पर्यंत मुदत

CD
सेकंड मेन स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला अखेर मुहूर्त! २१ ऑक्टोबरपर्यंत नावे देण्याच्या आयुक्तांकडून गटनेत्यांना सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा नऊ महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावत सहा आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत आपल्या पक्षाच्या कोट्यातील उमेदवारांची नावे शिफारस पत्रासह सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया रखडल्याने काँग्रेसचे गटनेते सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत महापालिकेची चार महिन्यांची मुदतवाढ मागणारी विनंती फेटाळली आणि सहा आठवड्यात नियुक्त्या पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ५) आयुक्त खत्री यांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेतली. पक्षीय संख्याबळानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि न्यायालयाचे नेमके निर्देश काय आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी या बैठकीत दिली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याने २१ ऑक्टोबरपर्यंत लेखी अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सात दिवसांत पूर्ण करून आयुक्तांमार्फत महासभेपुढे प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्यानंतर महापौरांकडून महासभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या बैठकीला उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्यासह भाजपचे श्याम बडोदे, शिंदे गटाचे अजय बोरस्ते, ठाकरे गटाचे केशव पोरजे आणि राष्ट्रवादीच्या सीमा ठाकरे उपस्थित होते. ---चौकट सहा जागांसाठी चारशे इच्छुक १२२ सदस्य संख्येत सध्या भाजपचे ७२, शिवसेनेचे २६, शिवसेना (उबाठा) १५, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे तीन, मनसेचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक आहेत. या संख्याबळाच्या प्रमाणात दहा स्वीकृत जागांचे वाटप होणार असून त्यात सर्वाधिक सहा जागा भाजपला मिळणार आहेत, तर शिंदे गटाला दोन आणि ठाकरे गट व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. या जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. विशेषतः भाजपमध्ये सहा जागांसाठी तब्बल चारशे जण इच्छुक असल्याने उमेदवार निश्चित करणे हे स्थानिक नेतृत्वापुढे मोठे आव्हान बनले आहे. इच्छुकांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच होणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादीतही उमेदवारांची नावे प्रदेश पातळीवरून जाहीर होणार असल्याने इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT