नाशिक

महापालिकेने कर माफिचा ठराव करावा

CD
महापालिकेने करमाफीचा ठराव करावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : महापालिका प्रशासन नागरिकांना विविध सुविधा देत नसेल तर महापालिकेत करमाफीचा ठराव पारित करा व येणाऱ्या नागपूर अधिवेशनात ठराव मंजूर करुन आणून शहरवासियांना करमाफी मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. सत्ताधारी आरोग्य, साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा आदी आवश्यक सुविधा देण्यास महापालिकेत अपयशी ठरत आहेत, पण त्याचे खापर महापालिका प्रशासनावर फोडून शहराचे आमदार मोकळे होत आहेत. एकीकडे आमदार भोळे महापालिका प्रशासनाच्या बैठकीत ‘सुविधा देऊ शकत नसाल तर नागरिकांकडून करवसुली बंद करा’ असे सांगत आहेत. परंतु महापालिका सुविधा देऊ शकत असो वा नसो नागरिकांना कर भरावाच लागतो, हे आमदारांनी आधी लक्षात घ्यावे. शहरातील व्यापारी गाळेधारकांचा गेल्या १५ वर्षांपासूनचा तीन टक्के दर कमी होऊ शकत नाही. आमदार भोळे यांना नागरिकांसाठी तळमळ असेल तर महापालिकेत ९५ टक्के नगरसेवक तुमचे आहे, सत्ता तुमची आहे तर तसा ठराव महापालिकेत पूर्ण बहुमताने ठराव मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्र्रावादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिग सूर्यवंशी, राजू मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा उपाघ्यक्ष किरण राजपूत आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

SCROLL FOR NEXT