Nandgaon Farmers taking payment in cash in the market committee here. esakal
नाशिक

Market Committee News : नांदगावला दररोज 80 लाखांची उलाढाल; नव्या व्यापाऱ्यांना परवाने दिल्याने लिलावातील अडथळा दूर

Nashik News : नांदगाव बाजार समितीने लिलावाची प्रचलित पद्धत पुन्हा अंगीकारत काही नव्या खरेदीदारांना उतरविल्याने काहीअंशी फायदा झाला.

संजीव निकम,नांदगाव

नांदगाव : कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याच्या घोषणेच्या दिवशी कांदा दराने उसळी खाल्ली व पंधराशेच्या भावात सहाशे ते सातशे रुपये अशी वाढ झाली. मात्र, या घोषणेचे सुख केवळ एका दिवसापुरते राहिले. बेवसाईट चालेनाशी झाली अन् दुसऱ्या दिवशी वाढलेला भाव पुन्हा घसरून पंधराशेवर येऊन स्थिरावला. (Nandgaon Market Committee has daily turnover of 80 lakhs)

लेव्हीचा तिढा सुटत नसल्याने नांदगाव बाजार समितीने लिलावाची प्रचलित पद्धत पुन्हा अंगीकारत काही नव्या खरेदीदारांना उतरविल्याने काहीअंशी फायदा झाला. सध्या नांदगाव बाजार समिती प्रतिदिन ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल होत आहे. बोलठाण उपबाजार समितीनंतर नांदगाव मुख्य यार्डमध्ये काहीअंशी लिलाव सुरु झाले.

सर्वात चांगला प्रतिसाद बोलठाणला मिळाला. बाजार समितीने नव्या परवानाधारकांना उतरविल्याने स्पर्धा वाढण्यास मदत झाली. त्याचे परिणाम बोलठाणला दिसून आले. नांदगावला सध्या दररोज साडेचार ते पाच हजार क्विंटलची आवक असून, नजीकच्या काळात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये दररोज ७० ते ८० लाखांची उलाढाल होऊ लागली असून, बाजारभाव साधरणतः पंधराशे ते सोळाशे आहे.

निर्यातबंदी उठविल्याचा कुठलाही लाभ फारसा पदरात पडलेला नाही. निर्यातबंदी उठेपर्यंत आहे तो कांदा विकला गेलेला होता. तालुक्यात सध्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवत असून, कांद्याला पाणी आणायचे कुठून व कसे, या चिंतेने शेतकरी त्रासला आहे. (latest marathi news)

आता काही प्रमाणात माणिकपुंज, टाकळी, तांदुळवाडी, जामदरी, कळमदरी, आमोदे, बोराळे, मळगाव, सावरगाव, पळाशी आदी भागात कांद्याचे उत्पन्न असले तरी ते अत्यल्प आहे. नांदगाव बाजार समिती संगणीकृत असून, दररोजच्या आर्थिक उलाढालीचे वैशिष्ट्ये म्हणजे समितीच्या मुख्य कार्यालयातून शेतकऱ्यांना पैसे अदा केले जातात. त्याला शेतकऱ्यांचा देखील प्रतिसाद आहे.

"लेव्हीच्या मुद्द्यावरून गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या आवारात नवीन परवाने देऊन प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाली-तोलाई कपात करून लिलाव सुरू केले. शेतकऱ्यांना कार्यालयात पैसे दिले जातात. निर्यातबंदी उठल्याचा फारसा फरक पडला नाही."- अमोल खैरनार, सचिव, बाजार समिती

"एक तर पाऊस नाही. त्यातही कमी उपलब्ध पाण्यात कांद्याचे उत्पन्न घेतले. ७० टक्के कांदा निघून गेला. ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशी अवस्था म्हणजे निर्यातबंदी घोषणेची झाली आहे." - निलेश चव्हाण, शेतकरी, चांदोरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT