Nashik Nandur Madhmeshwar Bird Sanctuary
Nashik Nandur Madhmeshwar Bird Sanctuary esakal
नाशिक

Nashik : नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये 9 हजार ‘पाहुणे’

आनंद बोरा

नशिक : नांदूरमधमेश्‍वर येथील पक्षी अभयारण्यात दुसरी मासिक पक्षी प्रगणना होऊन नऊ हजार १०३ ‘पाहुणे‘ आल्याची नोंद करण्यात आली आहे. या अभयारण्यात आलेल्या पाहुण्या पक्ष्यांमध्ये हिमालयातील चक्रवाक पक्ष्यासह कॉमन क्रेन नॉर्दन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन व्हिजन, गडवाल, मार्श हेरिअर, ब्ल्यू चिक बी इंटर यांचा समावेश आहे. शिवाय उघड्या चोचीचा बगळा, जांभळा, बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, सुनवल, रिव्हीर टर्न, कमळपक्षी, शेकाट्या, जांभळी पाणकोबडी, नदीसुरय आदी स्थानिक स्थलांतरित पक्षी आढळून आले आहेत.

पक्षी प्रगणना संपल्यानंतर पक्षीमित्रांना पक्ष्यांना ‘बर्ड रिंगींग'' कसे करतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी पक्षी निरीक्षण, ‘बर्ड रिंगींग'', पक्षी स्थलांतरणाबाबत माहिती दिली. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, गोदावरी पात्र, कोठूर, कुरुडगाव, काथरगाव या ठिकाणी झालेल्या पक्षी प्रगणनेत झाडांवरचे दोन हजार १९८ तर, सहा हजार ९०५ पाणपक्षी नोंदवले गेले. सहाय्यक वन्यजीव वनसंरक्षक विक्रम आहिरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी प्रगणना झाली.

स्थलांतरणासह अधिवासाची माहिती

‘बर्ड रिंगिंग'' हा शब्द ब्रिटन आणि युरोपसह जगाच्या इतर काही भागांमध्ये वापरला जातो. ‘बर्ड बँडिंग'' हा शब्द अमेरिकेत वापरला जातो. ‘बर्ड रिंगिंग’मध्ये एक अल्फा-न्यूमेरिक कोड असलेली लहान धातूची अंगठी जोडली जाते. देशात पक्ष्यांच्या एक हजार २६३ प्रजाती आणि ४७० स्थलांतरीत प्रजाती आहेत. देशात पक्ष्यांचे आगमन होत असताना त्यांचे नेमके ठिकाण आणि उड्डाणाचे मार्ग अद्याप अज्ञात आहेत. त्यामुळे या पक्ष्यांकडून वापरल्या जाणाऱ्या निवासस्थानांची आणि ठिकाणांची जोडणी ओळखण्यासाठी ‘बर्ड रिंगिंग'' उपयुक्त ठरते.

आम्ही देशातील सहा ‘वेट लँड’चा अभ्यास करत असून त्यामध्ये नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा समावेश आहे. एका उपक्रमात दिवसाला पाच ते वीस पक्ष्यांना ‘बर्ड रिगिंग'' केले जाते. त्याचे दप्तर ठेवले जाते. पुन्हा तो पक्षी दिसल्यानंतर त्याच्या पायातील ‘रिंग''वरील क्रमांकाने त्याची पूर्ण माहिती मिळते.

- ओमकार जोशी, शास्त्रज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT