Nandur Madhmeshwar Bird Sanctuary esakal
नाशिक

Nandur Madhmeshwar Bird Sanctuary : पक्षांचे निसर्ग निर्वाचन बनले कुरण

Nashik News : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याची देश विदेशातील पक्षांच्या आगमनाने सर्वदूर ख्याती आहे.

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असलेल्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याची देश विदेशातील पक्षांच्या आगमनाने सर्वदूर ख्याती आहे. निसर्गाच्या अभ्यासासाठी निसर्ग निर्वाचन केंद्राची निर्मिती झाली, पण सध्या या केंद्राची पुरती वाताहात झाली असून पक्षांसाठी बनवलेले निसर्ग निर्वाचन केंद्र आता गाईंचे कुरण बनले आहे. (Nandur Madhmeshwar Bird Sanctuary party nature constituency has become cow pasture)

नांदूर मधमेश्वर धरणाच्या पायथ्याशी असलेले खानगाव थडी शिवारातील हे केंद्र मोठा गाजावाजा करून आणि प्रचंड खर्च करून उभारण्यात आले. पर्यटकांना निसर्गाची, अभयारण्याची, सभोवताली आढळणाऱ्या पक्षी व प्राण्याची ओळख व्हावी. यासाठी स्थापन निसर्गनिर्वाचन केंद्रात अत्यंत महागडी अशी इलेक्ट्रॉनिक दृकश्राव्य ऑडिओ विज्युअल यंत्रणा बसविली होती.

गोदावरी नदीच्या काठावर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात सुमारे दीड एकर क्षेत्रात पर्यटक निवास पशुपक्षी उपचार आणि पुनर्वसन केंद्र, बोटॅनिकल गार्डन अशा विविध सुविधा पर्यटकांना या ठिकाणी देण्यात येणार होत्या. मात्र हे सगळे काही वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शून्य होऊन गेले आहे. तीन वर्षांपासून या केंद्राची संपूर्णपणे वाताहत झाली आहे. (latest marathi news)

उद्यानातील झाडांना उन्हाळ्यात पाणी दिले जात नव्हते. पावसाळ्यात पाणी मिळाल्याने झाडांची थोडीफार वाढ होईल अशी आशा होती मात्र या ठिकाणी काही पशुपालक आता खासगी गाईचे कळप चारायला सोडत असल्याने ही वन खात्याची बाग आहे की गुरांच्या चरण्याचे कुरण हा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्राची देखरेख करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांकडे सोपवली आहे. त्यांना वेळ नाही.

केंद्राच्या इमारतीला सर्वत्र गळती लागली असून वीज आणि पाणीपुरवठ्याची बोंब झालेली आहे. सर्वत्र काटेरी झुडपांचे रान माजले आहे. सुरक्षारक्षकांना मोठ मोठ्या सापांचे दर्शन घडते. त्यांनाच जीवाची भीती निर्माण झाली आहे. संबधितांना अनेक महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही. गरीब आदिवासी कुटुंबाला वेतन कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT