National Lok Adalat esakal
नाशिक

National Lok Adalat : राष्ट्रीय लोक अदालत येत्या 27 ला

Nashik News : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळवून घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव न्या. मिलिंद बुराडे यांनी केले आहे. (National Lok Adalat will be held on 27th)

जिल्हा न्यायलय तसेच जिल्ह्यातील इतर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. यामध्ये दिवाणी, तडतोडपात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भुसंपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच शासकीय अस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

त्यासाठी वित्तीय संस्था, बँका, महावितरण, महापालिका, जिल्हा परिषद, विमा कंपन्या, शासकीय कार्यालये यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकार्यांच्या बैठका घेऊन पूर्व तयारी करण्यात आली आहे. (latest marathi news)

लोकअदालतीसाठी प्रलंबित प्रकरणांपैकी सुमारे १२ हजार ६६ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. तर, दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १६ हजार ३५१ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

तसेच, मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा न्यायधीश एस.डी. जगमलानी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT