Sharad Pawar esakal
नाशिक

Nashik Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची पेरणी; शरद पवार यांच्या उपस्थितीत आज निफाड येथे शेतकरी मेळावा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी (ता. १९) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी (ता. १९) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. निफाड तालुक्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत मालोजीराव मोगल यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त शेतकरी मेळावा त्यांच्या उपस्थितीत होत असून, यानिमित्त ते नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. (Nashik Sharad Pawar)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशानंतर श्री. पवार प्रथमच जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शरद पवार आणि निफाड हे समीकरण गेल्या सहा दशकांपासून तसूभरही डळमळीत झालेले नाही. पवार यांचे एकेकाळचे सोबती मालोजीराव मोगल हे जिल्ह्यातील सर्वच केंद्रे हातात ठेवलेले धुरंधर राजकारणी होते.

दुलाजीनाना पाटील, माधवराव बोरस्ते, विनायकदादा पाटील यांच्यासारख्या अन्य नेत्यांनी त्यांना साथ दिली. पवार यांच्या राजकीय प्रवासात राज्यातील जे तालुके महत्त्वाचे साथीदार राहिले, त्यात निफाड हा पहिल्या तीनमध्ये आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता शुक्रवारी होत असलेल्या शेतकरी मेळाव्याला महत्त्व आहे.

मोगल यांनी तीन वेळा निफाडची आमदारकी भूषवली. त्यानंतर तो गट त्यांच्याच शिष्यांनी काबीज करीत पुढे त्याचे रूपांतर कदम-बनकर यात रूपांतरित झाला. पुढे कदम घराणे शिवसेनेत सामील होऊन रावसाहेब आणि मंदाकिनी कदम हे दाम्पत्य आमदार झाले. त्यानंतर त्यांचे पुतणे अनिल कदम यांनी दहा वर्षे आमदारकी राखली. दुसरीकडे दिलीप बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होत दुसऱ्या लढतीत मुंबई गाठली. (latest marathi news)

पुढे त्यांना दहा वर्षांनी पुन्हा तालुक्याने संधी देत आमदार केले. दिलीप बनकर हे अजित पवार गटात गेले; तर बनकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अनिल कदम हे शरद पवार यांच्या पडत्या काळात ‘गुड बुक’मध्ये जाऊन बसले. आगामी विधानसभा निवडणुकीत समीकरणं अशीच राहिल्यास अनिल कदम हे मशाल, तुतारी आणि पंजाचे; तर बनकर हे घड्याळ.

धनुष्यबाण आणि कमळ असे मफलर घालतील. मेळाव्याचे संयोजक जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल हे येणाऱ्या विधानसभा धामधुमीत मोगल गट म्हणून कोणती मोट बांधतात की पुन्हा मागील वेळेसारखा कुणाला तरी पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पवारांकडून काही अपेक्षा...

‘निसाका’ हा मध्यंतरी एका खासगी कंपनीने चालवायला घेतलेला कारखाना पुढे काही त्रुटींमुळे ठप्प झाला. शेतकरी मात्र आजही त्या चिमण्यांमधून धूर पाहण्याची आस बाळगून आहेत. ‘निसाका’ची मोकळी जागा ड्रायपोर्टसाठी हस्तांतरित झाली; परंतु पुढे त्याचे काय झाले, हे पाच वर्षांपासून कुणीही सांगायला तयार नाही.

तेथील कामगार भरती आणि अक्राळे येथे येणाऱ्या रिलायन्सच्या प्रकल्पात स्थानिकांना नोकरीसाठी शरद पवार यांनी वरिष्ठ स्तरावर मोठी भूमिका बजवावी, असा सूर चर्चेत आहे. जिल्हा बँक सक्तवसुलीबाबतही शेतकरी त्रस्त असल्याने त्याची शिथिलता अथवा इतर काही उपाय अशा महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत ते काय मनोगत व्यक्त करतील, हे महत्त्वाचे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT