Female Security Guard esakal
नाशिक

Nashik Female Security Guard : आम्ही नवदुर्गा - स्वत:च्या सुरक्षिततेसह महिलांचेही रक्षण

Latest Navratri 2024 News : आजच्या युगात स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच काही धाडसी महिला इतरांचे 'रक्षक' म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महिला सुरक्षेवर अनेकवेळा समाजामध्ये चर्चा व मतमतांतरे ऐकत असतो. मात्र, अनेकदा त्याबाबत पुढाकार घेणारे फार कमी असतात. परंतु, आजच्या युगात स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच काही धाडसी महिला इतरांचे 'रक्षक' म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत आहे. (Navratri 2024 Female Security Guards)

आजच्या जमान्यात अनेक उद्योजक, व्यावसायिक, सेलिब्रिटी हे नेहमी सुरक्षारक्षकांच्या गराड्यात वावरत असतात. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या कंपनी, लग्नसमारंभ, रुग्णालय, मॉल देखील आता सर्रास सुरक्षारक्षकेचा वावर असतो. यात खासकरुन पुरुषांची संख्या मोठी असते. मात्र, आता त्यांच्या बरोबरीने आता महिला देखील आता या क्षेत्रात मोठ्या संख्येने येत आहे.

नाशिक शहरात देखील महिला सुरक्षारक्षकांची संख्या सर्वत्र दिसत आहे. आपले घर, संसार आणि स्वत:ची सुरक्षिततेची जबाबदारींसह इतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी या महिला सुरक्षारक्षक आपली भूमिका पार पाडत आहे. शहरातील अनेक मोठी रुग्णालय, लग्नसमारंभ, मॉल, चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान आता महिला सुरक्षारक्षकांचा वावर सर्रास दिसून येत आहे.

सुरक्षारक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारताना आपल्याला दिलेले काम व्यवस्थितरित्या पार पडणे, गर्दीच्या दरम्यान सुरक्षा देत असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे, दुसऱ्याला दुखापत होईल किंवा अडचणी वाढतील अशा अनेक काळजी देखील या महिला सुरक्षारक्षकांना पार पाडावी लागतात. परंतु, हे सर्व करताना त्यांना अनेकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागते. (latest marathi news)

महिला सुरक्षा रक्षकांच्या समस्या

- आठ तासाचे काम असताना सुद्धा कामाच्या वेळेत वाढ

- अनेक उभे राहूनच काम करावे लागत असल्याने आरोग्याच्या समस्या.

- अनेकवेळा रात्री उशिराने प्रवास करण्याची वेळ

- कमी वेतन

- सुरक्षारक्षक म्हणून अनेकादा वादाला तोंड देण्याची वेळ

"जबाबदारी पार पाडत असताना अनेकादा घराकडे दुर्लक्ष होते. कौटुंबिक जबाबदारी पार पाडता येत नाही. कामाच्या ठिकाणी अनेकदा नागरिक ऐकूनच घेत नाही. त्यामुळे विनाकारण वाद होतात."- पुनम साळुंखे

"शहरात मोठा कार्यक्रम असल्यानंतरच महिला सुरक्षारक्षकाची आवश्यकता भासते. त्यामुळे नियमित स्वरूपाचे काम उपलब्ध होत नाही. अचानक दुसरे काम आल्यावर ते घेताही येत नाही. अनेकवेळा नागरिक ऐकून घेण्याच्या भूमिकेतच नसतात, त्यामुळे वादाला सामोरे जावे लागते."

- माधुरी शिरसाठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायला तयार, पण... ''; उद्धव ठाकरेंनी घातली मोठी अट, काय म्हणाले?

Eknath Shinde: ''ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है..'', एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; पक्षात येणाऱ्यांबद्दल थेटच बोलले

४८ तास महत्त्वाचे! महाराष्ट्रासह १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Pune News : खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल; १०७ परवाने निलंबित; ७ गुन्हे दाखल, कृषी विभागाची कारवाई

Lohara News : आष्टा कासार येथील घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांची झाडझडती; ​३० जूनपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे अर्चनाताई पाटील यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT