Rameshgiri Maharaj during the Ghat installation in Jagdamba Mata temple area on the occasion of Navratri festival at Kotamgaon esakal
नाशिक

Nashik Navratri 2024 : जगदंबेच्या चरणी हजारो भाविक लीन! कोटमगावला रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना, हजारांवर भाविक बसले घटी

Latest Navratri 2024 News : पहिल्याच दिवशी हजारो भाविक जगदंबा मातेच्या चरणी लीन झाले. पहाटेपासूनच येवला ते कोटमगाव रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

सकाळ वृत्तसेवा

येवला : जगदंबा मातेच्या भूतलावरील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा माता मंदिरात गुरुवारी (ता. ३) सकाळी राष्ट्रसंत सद्‍गुरू जनार्दन महाराजांचे शिष्य कोपरगाव बेट येथील रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी हजारो भाविक जगदंबा मातेच्या चरणी लीन झाले. पहाटेपासूनच येवला ते कोटमगाव रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. (Thousands of devotees flock at Jagdamba Kotamgaon)

येथील जगदंबा मातेची स्वयंभू मूर्ती म्हणजे महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती ही तिन्ही रूपे एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. पहिल्या दिवशी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यांसह इतरत्रचे दोन हजार भाविक घटी बसले आहेत. घटस्थापनेनंतर रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. जगदंबा देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र जोशी यांनी पौरोहित्य केले. मंत्रांच्या नामघोषात जगदंबा मातेचा जागर करण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, अंबादास भोसले, दिलीप कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांच्यासह ग्रामस्थ व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसर सुशोभीत करून मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. मूर्तीला दररोज विविध रंगांतील पैठणी साड्याही परिधान केल्या जातील.

यात्रोत्सवाने परिसर फुलला

कोटमगाव येथे नऊ दिवस लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने विविध दुकानांनी यात्रा सजली असून, रहाटपाळणे, सौंदर्यप्रसाधने, छोटे खेळ, मिठाई, हॉटेल्स आदींची दुकाने थाटली आहेत. नवसाला पावणारी देवी अशीही ख्याती असल्याने नवसपूर्ती करणाऱ्यांची संख्याही अधिक असते. वर्षानुवर्षे येथे घटी बसणाऱ्यांची संख्याही मोठी असून, सलग १०-१५ वर्षे काही भाविक यंदाही घटी बसल्याचे सांगण्यात आले. (latest marathi news)

उलटे टांगण्याची परंपरा मोडीत...

देवीपुढे उलटे टांगून घेत नवसपूर्ती करण्याची परंपरा येथे वर्षांनुवर्षे होती. पाच-सहा वर्षांपासून अंधश्रद्धेमुळे ही परंपरा मोडीत निघाली आहे. आता देवीला साडी-चोळी, पैठणी अर्पण करून घटी बसून तसेच प्रसादाचा नैवेद्य दाखवून नवसपूर्ती केली जाते.

"जगदंबा मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येणार असल्याने ट्रस्ट व ग्रामपंचायतीने सर्व नियोजन केले आहे. आज घटस्थापना झाली असून, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध केल्या. रोज विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात्रा उत्साहात व व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे व विश्वस्तांचे सहकार्य मिळत आहे."

- रावसाहेब कोटमे, अध्यक्ष, जगदंबा देवस्थान ट्रस्ट, कोटमगाव

यात्रोत्सवासाठी ट्रस्टची तयारी

- परिसरात ३२ सीसीटीव्हींचा ‘वॉच’

- मंदिर २४ तास खुले राहणार

- सोयी-सुविधांसाठी १०० वर स्वयंसेवक तैनात

- यात्राकाळात ३०० पेक्षा अधिक हॉटेल्स, खेळणी व इतर दुकाने थाटली

- पाच हजारांहून अधिक भाविकांची नवसपूर्ती

- रोज पहाटे तीन हजारांवर भाविक पायी दर्शनाला

- घटी बसणाऱ्यांसाठी रोज धार्मिक कार्यक्रम

- २० वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात

- रोज सकाळी आठला, रात्री नऊला होणार महाआरती

- कुणाल दराडे फाउंडेशन, येवला डॉक्टर असोसिएशनतर्फे मोफत तपासणी, उपचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT