Jagdamba Mata temple area in Kotamgaon has got a new look. esakal
नाशिक

Jagdamba Mata Mandir: जगदंबामातेच्या चरणी तीन हजारांवर भाविक बसणार घटी! कोटमगावला यंदा गर्दी वाढणार, दर्शनाचे नियोजन

Latest Navratri 2024 News : यंदा मंदिर प्रशासनातर्फे भाविकांच्या दर्शनासाठी वाढीव नवीन रांग तयार करण्यात आली असून नवरात्रोत्सवात मंदिराच्या आवारात यंदाही तीन ते चार हजार भाविक घटी बसणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

येवला : श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून या शक्तीपिठांपैकीच कोटमगावची श्री महाकाली,श्री महालक्ष्मी,श्री महासरस्वती या तिन्ही स्थानाचे त्रिगुणात्मक रूप श्री जगदंबा माता आहे.राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या श्री जगदंबामातेच्या यात्रेची देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीसह प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यंदा मंदिर प्रशासनातर्फे भाविकांच्या दर्शनासाठी वाढीव नवीन रांग तयार करण्यात आली असून नवरात्रोत्सवात मंदिराच्या आवारात यंदाही तीन ते चार हजार भाविक घटी बसणार आहेत. (three thousand devotees ghatasthapana at Jagdamba Mata)

महाकाली,श्री महालक्ष्मी,श्री महासरस्वती या तीन रुपांमध्ये एकरुप असलेल्या अन् नवसाला पावणारी माता म्हणूनही देवीची ओळख आहे. येथे नवरात्रोत्सवात तीन हजारावर भाविक घटी बसतात तर नगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातील लाखो भाविक या काळात दर्शनासाठी गर्दी करतात.

यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी नऊ वाजता कोपरगाव बेट येथील सदगुरु रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते येथे घटस्थापना करण्यात येणार आहे. कळस व मंदिराची रंगरंगोटी व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.देवस्थानच्या वतीने मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी २४ तास मंदिर खुले राहणार आहे.भाविकांच्या सोयी सुविधेसाठी १०० वर स्वयंसेवक, ग्रामपंचायतचे २५ कर्मचारी तर स्वच्छतेसाठी १५ महिला स्वयंसेवक तैनात करणार असून मंदिर परिसरात यंदा यात्राकाळात ३०० पेक्षा अधिक हॉटेल्स, खेळणी व इतर दुकांनाची सोय करण्यात आली आहे. भक्तनिवास व मंदिर ट्रस्टने सुमारे ४ हजार घटी बसणाऱ्या भाविकांची सोय केली आहे. (latest marathi news)

रोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वाल्मीक महाराज बाळापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. आरओचे शुद्ध पाणी व मोफत गोळ्या औषधे पुरविण्यात येणार आहेत. मेडिकल प्रॅक्टिकल असोसिएशन, प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसूल व कुणाल दराडे फाऊंडेशनने यात्रा काळात नऊ दिवस घटी बसणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करणार असून औषधेही देणार आहेत.

दररोज २४ तास वीजपुरवठा केला जाणार असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यासाठी कार्यरत राहणार मंदिर असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे,विश्वस्त भाऊसाहेब आदमने, शुभदा दानी,दिलीप कोटमे, अंबादास भोसले, अंबादास लहरे, गणेश कोटमे,शंकर कोटमे,लहानु धांद्रे,शैला कलंत्री,सुमनबाई कोटमे तसेच व्यवस्थापक राजेंद्र कोटमे आदी यात्रेचे नियोजन करत आहेत.

नाशिक-संभाजीनगर महामार्गावरच गाव असल्याने वाहतूक विस्कळित होऊ नये यासाठी येवल्याकडून येणाऱ्या भाविकांसाठी दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी एन्झोकेम लॅबोरेटरीज कंपनीच्या आवारात तर संभाजीनगर भागाकडून येणाऱ्या भाविकांसाठी खासगी जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्टने संभाजीनगर मार्गापासून मंदिर आवारापासून जाणाऱ्या जुन्या मार्गावर स्ट्रीट लाईटची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT