नाशिक

नवरात्रोत्सवात जुना आग्रा रोड होणार वाहतुकीसाठी बंद

CD
पान एक ॲंकर ------------------ नवरात्रोत्सवात जुना आग्रा रोड वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गांचे नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू असल्याने सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालयासह मुख्य बाजारपेठेकडे येण्यासाठी मुंबई नाका ते अशोकस्तंभ हाच एकमेव रस्ता आहे. मात्र चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या कालिका देवी यात्रोत्सवासाठी मुंबई नाका ते गडकरी सिग्नल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. यामुळे वाहतूक शाखेने सारडा सर्कल ते मुंबई नाका आणि मुंबई नाका ते चांडक सर्कल हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचे नियोजन आखले आहे. नवरात्रोत्सवाला रविवारी (ता.११) घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवात जुना आग्रा रोडवरील श्री कालिका देवी यात्रोत्सव असतो. यामुळे या काळात मुंबई नाका ते गडकरी सिग्नल या दरम्यान दुतर्फा यात्रोत्सवातील व्यावसायिकांची दुकाने असतात. तर दुपारनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी असते. त्यामुळे सदरील रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी बंद असतो. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांने वळविण्यात येते. एरवी, पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत नाही. परंतु सद्यःस्थितीत शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरू आहेत. द्वारका सर्कल पूर्णत: वाहतुकीसाठी खुला नाही. त्यामुळे सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय व पंचवटीकडे जाण्यासाठी मुंबई नाका मार्गे अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. परंतु, नवरात्रीत तोही बंद होणार आहे. ..... वाहनधारकांना दोन पर्यायी मार्ग मुंबई नाका ते गडकरी सिग्नल मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कलमार्ग मुंबई नाक्याकडे जाणार आहे. तर, मुंबई नाक्याकडून सीबीएस, अशोकस्तंभकडे जाणारी वाहतूक ही रुची हॉटेलसमोरून चांडक सर्कलकडे वळविण्यात येणार आहे. या मार्गांवर यात्रेचीही गर्दी असते. परंतु, यावेळी पोलिसांकडून हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दोन्ही रस्त्यावर वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डनची अतिरिक्त नेमणूक केली जाणार आहे. परंतु, सायंकाळपासून रात्रभर असणारी वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडीच्या समस्येला नाशिककरांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. 31518 नवरात्रोत्सवात मुंबई नाका ते गडकरी सिग्नल रस्ता दुपारनंतर मध्यरात्रीपर्यंत बंद असेल. पर्यायी मार्गांची उपलब्धता केली असून, त्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक अंमलदारांची नियुक्ती केली जाणार आहे. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी नियोजन केले जात आहे. - माधव रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा, नाशिक

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT