NCp party esakal
नाशिक

Nashik NCP News: नाशिक बालेकिल्ला कायम राहील : मेहबूब शेख

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना मानणारा नाशिक जिल्हा बालेकिल्ला कायम राहील, असा आशावाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदग्रहण व प्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. (Nashik NCP News Nashik fort will remain forever Mehboob Shaikh political)

शहराध्यक्ष गजानन शेलार व जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालय मुंबई नाका येथे मेळावा झाला.

प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, नाशिक शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस शदाब सय्यद, प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार, प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,

जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड, जिल्हा महिला अध्यक्ष संगीता पाटील, प्रदेश पदाधिकारी अतुल पाटील, दिनेश धात्रक, गोरख ढोकणे महिला शहराध्यक्षा अनिता दामले, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

शेख म्हणाले, राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक संघटन बळकट करण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला, त्यांना धडा शिकविण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती व्हावी.

वीस वर्ष ज्यांनी सत्ता भोगली ज्यांना उपमुख्यमंत्री केले, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते अशी पद भोगली तेच भुजबळ आता पवारांवर टीका करू लागले आहे. येणाऱ्या काळात त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यांच्या झाल्या नियुक्त्या

अध्यक्ष- नाशिक पश्चिम विधानसभा धनंजय रहाणे, सिडको विभाग : विजय मटाले , सातपूर विभाग : प्रवीण नागरे, कार्याध्यक्ष सिडको विभाग : कृष्णा काळे, शहर कार्याध्यक्ष : किरण पानकर, शहर उपाध्यक्ष : नितीन पिंगळे, नवराज रामराजे, शहर सरचिटणीस फाहीम सय्यद, गौरव सोनवणे, अध्यक्ष मध्य विधानसभा सागर बेदरकर, अध्यक्ष मध्य विभाग: सलीम शेख , अध्यक्ष पश्चिम विभाग गुरुदत्त दामले, नाशिक रोड विभाग अध्यक्ष : समाधान कोठुळे, सातपूर विभाग- अभिमन्यू गुडघे, सिडको विभाग- विक्रांत डहाळे, कार्याध्यक्ष पश्चिम विधानसभा : निखिल भावसार

अध्यक्ष पश्चिम विधानसभा : स्वप्नील दुसाने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT