Guardian Minister Dada Bhuse while flagging off the new 75 two-wheelers available for patrolling at Nashik Rural Superintendent of Police Office, esakal
नाशिक

Nashik Rural Police : ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात नव्या 75 दुचाकी; पालकमंत्री भुसेंच्या हस्ते लोकार्पण

Nashik News : नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने ७५ दुचाकी सामाविष्ट झाल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वाहनांना शनिवारी (ता. २०) हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने ७५ दुचाकी सामाविष्ट झाल्या आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वाहनांना शनिवारी (ता. २०) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर नवीन वाहनांचे लोकार्पण झाले. (New 75 two wheelers in fleet of rural police force)

पालकमंत्री दादा भुसे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपस्थित होते. नाशिक ग्रामीण पोलिस दलांतर्गत ४० पोलिस ठाणे असून, आठ उपविभागीय कार्यालये आणि नाशिक व मालेगाव येथे अपर अधीक्षक कार्यालय आहे.

डायल ११२ योजना कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी वाहनांची आवश्यकता होती. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधीक्षक कार्यालयाने दुचाकी वाहनांची मागणी नोंदविली होती. (latest marathi news)

त्यानुसार ७५ दुचाकी अधीक्षक कार्यालयासाठी प्रदान करण्यात आल्या. यात ४५ होंडा शाइन, तर ३० पल्सर आहेत. या वाहनांमुळे पोलिसांना ग्रामीण भागात गस्त करणे आणि डायल ११२ वर आलेल्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

मुख्यालयाचे उपअधीक्षक नितीनकुमार गोकावे, उपअधीक्षक बापूराव दडस, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय करे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक दत्ता चौधरी यांच्यासह अंमलदार, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT