red onion esakal
नाशिक

Nashik Onion News : कसमादेत दसऱ्याला नवा लाल कांदा बाजारात! बाजारात कांदा आणण्याची लगबग

Latest Onion News : नवीन कांद्याला चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून कांदा बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान येथील मुंगसे बाजारात उन्हाळी कांद्याला मंगळवारी (ता. ८) साडे चार हजार रुपये क्विंटल सर्वोच्च भाव मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप व लेट खरीप कांद्याचे जम्बो उत्पादन घेतले जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेने कांदा लागवडीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही १० ते १५ टक्के उन्हाळी कांदा चाळीमध्ये आहे. दसऱ्याच्या सुमारास नवीन लाल कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.

नवीन कांद्याला चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून कांदा बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान येथील मुंगसे बाजारात उन्हाळी कांद्याला मंगळवारी (ता. ८) साडे चार हजार रुपये क्विंटल सर्वोच्च भाव मिळाला. (New Red Onion in kasmade on Dussehra)

कसमादेत गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले. सुरवातीला शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्री केली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर केंद्र शासनाने निर्यातबंदी उठवली. गेल्या चार महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मध्यंतरी भाव पाच हजारापर्यंत गेला होता. महिन्यापासून सरासरी बाजारभाव चार हजाराच्या आसपास आहे. यावर्षी चांगल्या पावसामुळे व कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे खरीप व लेट खरीप कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आला. (latest marathi news)

भावाची आशा

नवीन लाल कांद्याला पाच हजाराच्या वरच भाव मिळण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात आगाऊ लागवड केलेला कांदा काढणीला आला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरु आहे. यावर्षी विजयादशमीला लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून येईल. दिवाळीनंतर मात्र मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येवू शकेल. उन्हाळी कांद्याचे भाव अजूनही टिकून आहेत. येथील बाजार समितीच्या मुंगसे उप बाजारात मंगळवारी ४५१ वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता.

कांद्याचे भाव (दर प्रति क्विंटल)

- उन्हाळी कांदा ४२०० ते ४ ५००,

- साधारण सुपर ३९०० ते ४२२५,

- गोल्टी-गोल्टा ३३०० ते ३८५०,

- खाद- चोपडा १५०० ते २ ६००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT