जिल्ह्यात एसआयआर मोहिम पूर्णत्वास
३७ हजार नवमतदार ः मतदार याद्या छपाईसाठी प्रशासनाची आयोगाकडे धाव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : मतदारयादी विशेष पुर्नरिक्षण मोहिमेच्या (एसआयआर) दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची पडताळणी तसेच सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंधराही मतदारसंघातील मतदार याद्या छपाईसाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. यादरम्यान, ३७ हजार नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्यात महसूल प्रशासनाने बीएलओंच्या सहकार्याने मतदारांनी नोंद घेतली. त्यानुसार १ सप्टेंबरला ४० लाख ७६ हजार ६६८ मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे वगळण्यात आली. वगळलेल्या नावांमध्ये मृत, दुबार, कायमस्वरुपी स्थलांतरीत तसेच संपर्क न झालेल्या मतदारांचा समावेश होता. आयोगाच्या मार्गदर्शनानुसार संपर्क न झालेल्या तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता, वय तसेच इतर १३ बाबींवर शंका असलेल्या अशा साधारणतः साडेसात लाख मतदारांना नोटिसा बजावत रीतसर सुनावणी झाली. त्यामुळे अंतिम टप्यात मतदारयाद्यांच्या छपाईची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. आयोगाची परवानगी मिळताच अंतिम मतदार याद्यांची छपाई करण्यात येईल. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ३० नोव्हेंबरला अंतिम याद्यांची प्रसिद्धी केली जाईल, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.