Agent scanning boxes at Railway Parcel Service
Agent scanning boxes at Railway Parcel Service esakal
नाशिक

Nashik News : एका पार्सल खोक्यामागे 5 रुपयाचा भुर्दंड! जादा कराने शेतकरी, व्यापारी संतापले

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानकात एका खोक्यामागे पाच रुपये कर भरावा लागत असल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी (Farmers) सामान्य नागरिक संतापले आहेत. त्यामुळे रेल्वेने नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा हा कर रद्द करावा, अशी मागणी होत आहे. (Nashik News 5 rupees per parcel box Farmers traders angry at excessive tax on railway station department marathi news)

नाशिक रोड रेल्वे स्थानकात पार्सल विभागात स्कॅनिंग मशिन लाऊन रेल्वेने प्रत्येक डागामागे पाच रुपये शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भाजापीला, फुले, फळे, औद्योगिक वस्तू पाठविणारे शेतकरी, व्यापारी, उद्योजक संतप्त झाले आहेत. येथून दिवसाला सरासरी १ हजार खोकी (डाग) देशभरात रवाना होतात.

एक किलोचे खोके असो व अन्य कितीही वजनाचे खोके असो, प्रत्येकामागे पाच रुपये शुल्क आकारले जात असल्यामुळे सध्या शेतकरी आणि व्यापारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. नाशिक रोडला ब्रिटिश काळापासून रेल्वेतून कृषिमाल, फुले, फळे व अन्य माल देशभरात पाठवला जात आहे.

या सुविधेमुळे नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आणि पैसेही मिळतात. १ फेब्रुवारीपासून स्कॅनिंग मशिन बसविल्याने शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. मात्र, स्कॅनिंग मशिनची किंमत लगेच वसूल होईल, एवढा महसूल रेल्वेला नाशिक रोडमधून मिळत असतानाही स्कॅनर सुरू ठेऊन लूट सुरू असल्याचे व्यापारी, कार्टिंग एजंट यांचे म्हणणे आहे. (Latest Marathi News)

दररोज दहा ते बारा टन गुलाब

नाशिक रोडहून रेल्वेने देशभरात कृषिमाल जातो. त्यात जानोरी, सायखेडा येथून दररोज दहा ते बारा टन गुलाब फुले दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारला जातात. नाशिक, संगमनेरची सीताफळाची शेकडो खोकी देशभरात जातात. हंगाम सुरू असतो तेव्हा दररोज ४० हजार किलो फ्लॉवर, ५० हजार किलो ढोबळी मिरची, १ लाख किलो डाळिंब, ४० ते ५० हजार किलो कोबी, हजारो किलो द्राक्ष दररोज देशभरात जातात.

सुरतवरून भेंडीची आवक

सुरतवरून ट्रकने नाशिक रोडला भेंडीची आवक होते. ती रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहार, कोलकता, अलाहाबाद, गोरखपूर, बनारस, कानपूर, झारखंड आदी ठिकाणी जाते. सध्या रोज पाचशे खोकी येतात. जिल्ह्यातील एमआयडीसीतून प्लॅस्टिक, मोटरपार्ट, कपडे, शेती उपकरणे आदी रेल्वेने पाठविली जातात.

या सर्व प्रकारच्या मालांना रेल्वे किलोमागे सहा रुपये भाडे घेते. यातून रेल्वेला ७० त ८० लाख उत्पन्न मिळते. एवढे असतानाही आता एका खोक्यामागे पाच रुपये स्कॅनिंग शुल्क सुरू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT