Crop Crisis esakal
नाशिक

Nashik Crop Crisis : सिन्नर तालुक्यात कधी ढगाळ, कधी ऊन, तर कधी थंडी; पिकांवर अनेक रोगांचं संकट

Nashik News वर्षभरात अनेक वेळा अवकाळी पाऊस, सकाळी थंडी, दुपारी ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण असे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : वर्षभरात अनेक वेळा अवकाळी पाऊस, सकाळी थंडी, दुपारी ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण असे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे शेतीचे नियोजनच कोलमडले आहे. त्यातच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी शेती, तरी कशी करायची, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

दोन-तीन दिवसांपूर्वी काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. याचा परिणाम तालुक्यातही झाला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे. (Crop Crisis)

सध्या अनेक शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा काढणीसाठी आले आहे, जर अवकाळी पाऊस झाला, तर मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. याचबरोबर ढगाळ वातावरणाचा फटका इतर पिकांनाही बसत आहे. त्यामुळे औषधे फवारणीचाही खर्च वाढला आहे.

आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. त्यात एकामागून एक संकटे येत असल्याने शेतकरी अक्षरशः त्रस्त झाला असल्याची व्यथा गोवर्धन रानडे, ज्ञानेश्वर गडाख, दिनेश गडाख, संदीप रानडे, मधुकर गडाख, नितीन गिते ,सागर गिते, गणेश चव्हाण यांनी मांडली.

बाजारभाव नाही, ढगाळ वातावरणामुळे पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आहे. निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे बाजारभावही कोसळले आहेत. दुधाला भाव नाही पशुपालक हवालदिल झालेले आहे. शेतकरी राजावर एकावर एक संकटे येत असून अनेक शेतकऱ्यांनी अनेक बँकांचे कर्ज काढल्याने कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे व शेतीमालाला भाव नाही असे सर्व संकट आज शेतकरी राजावर ओढवले आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले, कोणतेही पीक घेतले, तर ते चालू होईपर्यंत त्याला बाजारभावच नसतो. त्यामुळे सर्वच खर्च अंगलट येत आहे. सध्या शेतकऱ्यांचे लाल कांदा काढण्याचे काम सुरू आहे.

मात्र, त्यालाही म्हणावा तसा बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही डोक्यालाच हात लावला आहे. त्यामुळे पीक तरी कोणते घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सतत वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शेतीचे गणित अक्षरशः कोलमडले असल्याने आम्ही शेतकऱ्यांनी नेमकी कोणती पिके घ्यावे जेणेकरून त्याला चांगले बाजारभाव मिळतील, असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अवकाळी पाऊस असे अनेक संकटे येत असून कोणत्याच मालाला भाव मिळाला नाही. त्यात पिके घेण्याच्या वेळेस पावसाने दडी मारल्याने अनेक पिके हातातून गेली

"वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांवर संकटे येत असल्याने त्यांची बिकट अवस्था झाली आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही. खते-औषधांच्या किमतीही भरमसाट वाढल्या आहेत. याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती तरी कशी करायची." -अक्षय सदाशिव भगत, युवा शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT