Nashik esakal
नाशिक

Nashik: मदरशात शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांची तस्करी? तपासासाठी दोन पथके सांगली बिहारकडे रवाना

पाचही संशयितांना कोठडी

, सकाळ वृत्तसेवा

भुसावळ/मनमाड: बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी २९ मुलांना जळगावच्या तर ३० मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात दाखल केले आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेल्या पाच संशयितांपैकी हजरत मौलाना मोहम्मद आलम यास भुसावळ रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे न्यायालय भुसावळ येथे हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत (ता.५) पोलिस कोठडी देण्यात आली तर इतर चौघा संशयितांना मनमाड लोहमार्ग पोलिसांनी चांदवड न्यायालयापुढे हजर केले असता बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या या तस्करीच्या गुन्ह्यात रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळ येथे २९ तर मनमाड रेल्वेस्थानकावर ३० अशा ५९ बालकांची सुखरूप सुटका करून तस्करी करणाऱ्या पाच संशयित तस्करांना अटक केली आहे. या मुलांना सांगली येथील मदरशात शिक्षणाच्या नावाखाली घेऊन जात तस्करी करत असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भुसावळला अटकेत असलेला संशयित हजरत मौलाना मोहम्मद आलम यास पाच दिवसांची तर सद्दाम हुसेन सिद्दिकी, नौमान सिद्दिकी, एजाज सिद्दिकी, मोहम्मद शहा (रा. सर्व अररिया बिहार) या चौघा संशयिताना मनमाड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन चांदवड न्यायालयापुढे हजर केले असता बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक सांगली तर दुसरे पथक शुक्रवारी (ता.२) बिहारला रवाना होणार आहे. बालकल्याण समिती व कमिटीतर्फे मुलांची

चौकशी सुरू आहे. भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याला महाराष्ट्र बालकल्याण आयोगाच्या सदस्यांनी भेट देऊन या

प्रकरणाची सर्व माहिती

पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्याकडून जाणून घेतली. सदरील तपासाअंती पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT