Chetan Thamke esakal
नाशिक

Nashik News : एकलहरे परिसरात युवकाचा खून

Nashik : येथील एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ एका युवकाचा धारदार हत्याराने खून झाल्याचे रविवारी (ता.१८) सकाळी उघडकीस आले.

सकाळ वृत्तसेवा

एकलहरे : येथील एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ एका युवकाचा धारदार हत्याराने खून झाल्याचे रविवारी (ता.१८) सकाळी उघडकीस आले. रस्त्याने कामावर जाणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने एका नागरिकाने पोलिसांना कळविले. पोलिस पथकाने येथे येऊन पाहणी व पंचनामा केला. (Dead body of young man)

खून झालेल्या तरुणाचे नाव चेतन ठमके असल्याचे नाशिक रोड पोलिसांनी सांगितले. रविवारी (ता.१८) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

खून झालेल्या ठमकेचे वय साधारण ३० ते ३५ असून तो विजय नगर, सिडको या भागातील आहे. त्याला या भागात कोणी आणले होते का, तो स्वतःच आला होता याबाबतही पोलिस शोध घेत आहेत. युवकाच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले आहेत. दरम्यान याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT