medicine esakal
नाशिक

Nashik News : लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

निफाड तालुक्यात आरोग्य विभागातर्फे जंतविरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यात आरोग्य विभागातर्फे जंतविरोधी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

शिल्लक लाभार्थ्यांना मंगळवारी (ता. २०) गोळ्यांचे वाटप होणार आहे. (nashik news Distribution of deworming pills to more than lakh students in district nashik news)

विद्यार्थ्यांना सदृढ आरोग्य राहण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. पोटातील जंतवाढीमुळे अनेक मुलांच्या शारीरीक वाढीवर परिणाम होऊन स्वास्थ बिघडते. हे हेरून आरोग्य विभागातर्फे सहा महिन्यांतून एकदा जंतविरोधी ‘अल्बेडाझोल’ गोळ्यांचे वाटप शाळेतून केले जाते.

शाळाबाह्य मुलांनाही गोळ्या दिल्या जातात. निफाड तालुक्यात अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळेत गोळ्यांचे वाटप करण्यात आले. निफाड तालुक्यात एक लाख ३७ हजार बालकांना जंतविरोधी गोळ्या देण्याचे उद्दिष्ट होते.

त्यात एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांना त्या देण्यात आल्या आहेत. निफाड तालुक्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. पिंपळगाव बसवंत आरोग्य केद्रांतर्गत डॉ. वैशाली कदम, डॉ. योगेश धनवटे, आरोग्य सहाय्यक शरद तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली १८ हजार विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT