Dogs
Dogs esakal
नाशिक

Nashik News : हृदयद्रावक! बेवारस अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड परिसरातील अंबिका नगरमध्ये एका दिवसाच्या बेवारस अर्भकाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदरील बेवारस अर्भक हे स्त्री जातीचे होते. अनैतिक संबंधातून ते जन्माला आले असावे वा मुलगी असल्याने ते बेवारस टाकून देण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारात असलेल्या अंबिकानगरमध्ये भागवत बुधा पाटील यांच्या घरानजिक असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ अज्ञात व्यक्तीने एका दिवसाचे नवजात अर्भक टाकून दिले. या अर्भकाचे परिसरातील भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले होते. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्या नवजात अर्भकाचा मृत्यु झाला. सदरची बाब सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली आहे.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

परिसरातील अज्ञात व्यक्तीने सदरील अर्भक हे अनैतिक संबंधातून वा मुलगी असल्याने बेवारसपणे टाकून दिले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक खतेले हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT