Saptshringgad locality esakal
नाशिक

Nashik News : सप्तशृंगगड विकासासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध; 7 वर्षांनी विकासकामांना प्रारंभ

Nashik : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर विकासकामांना प्रत्यक्षात सुरवात होत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील मंजूर कामे करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हाधिकारी नाशिक यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता दहा कोटी ८० लाखांचा निधी वितरित केला असून, श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर विकासकामांना प्रत्यक्षात सुरवात होत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. (Saptshringigad development)

सप्तशृंगगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास ३० नोव्हेंबर २३ च्या शासन निर्णयान्वये ८१.८६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर २०२३ च्या अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेच्या अंतर्गत विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उपलब्ध झालेल्या निधीमधून या आराखड्याकरिता जिल्हाधिकारी नाशिक यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार श्रीक्षेत्र सप्तशृंगीदेवी, सप्तशृंगगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत मंजूर कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी, नाशिक यांना मुख्य लेखाशीर्ष मोठी बांधकामेअंतर्गत दहा कोटी ८० लाख नऊ हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे. यात स्वच्छतागृह बांधणे- ७५ लाख, डोम बांधणे- दोन कोटी, साइड गटार व रस्त्याचे बांधकाम करणे- दोन कोटी ५० लाख, वन जमिनीवर विविध विकासकामे करणे- तीन कोटी ८१ लाख ७३ हजार, वन जमिनीवर नक्षत्र बगीचा तयार करणे- एक कोटी ७३ लाख ३६ हजार या कामांचा समावेश आहे.

''पालकमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने गडाच्या विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.''-संदीप बेनके, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य

''२०१७ मध्ये सप्तशृंगगडास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दादा भुसे यांच्या प्रयत्नांतून मिळाला होता. तद्पासून तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास आराखड्यास मंजुरी व निधीसाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर होत होते. सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाल्याने आता आदिमायेच्या भक्तांना चांगल्या सुखसुविधा उपलब्ध होऊन गडाचा विकास होणार आहे.''-राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yajna Ritual: खळबळजनक ! देवाचं बोलावणं आलं, २० भाविक देहत्याग करणार; पुण्यातील भाविकांचाही समावेश, नेमकं काय घडलं?

GST Reform: GSTतील बदलामुळे सरकारला बसणार 40,000 कोटींचा फटका; नवे दर दिवाळी नाही तर 'या' दिवशी लागू होणार

Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पुण्यातील मंडळांचे आकर्षक देखावे सज्ज

आदिनाथ कोठारेचा नवा अवतार! पहिल्यांदाच मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार, प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

RBI: रिझर्व्ह बँकेचा खातेदारांना दिलासा!

SCROLL FOR NEXT