electricity esakal
नाशिक

Nashik News : वीज तोडल्यामुळे लासलगावकर पाण्यापासून वंचित

Nashik : वीज बिल थकल्याने लासलगावसह अन्य पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नागरिक पाण्यापासून वंचित झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणी योजनेचे ३२ लाख रुपये वीज बिल थकल्याने लासलगावसह अन्य पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने उन्हाळ्याच्या सुरवातीलाच नागरिक पाण्यापासून वंचित झाले आहेत. लासलगावच्या सरपंच पदाचा तिढा अद्यापही न सुटल्याने लासलगावकरांचा पाणी प्रश्न, कसा सुटणार या विवंचनेत नागरिक आहेत. ()

गेल्या वर्षी वारंवार पाइपलाइन फुटत असल्याने लासलगावकरांना मोठ्या प्रमाणात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तब्बल २५ ते ३० दिवसांनी लासलगावमध्ये पाणी येत होते. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्यामार्फत नवीन सोळा गाव पाइपलाइन योजना पूर्णत्वास आली आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडल्याने लासलगाव शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कोणी लक्ष देणार का, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात आहेत.

थकीत पाणीपट्टीचा प्रश्न ऐरणीवर

मागील काही काळात लासलगाव १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा संपूर्णपणे विस्कळित झाला होता. त्यामुळे लासलगावकरांना १५ ते २० दिवस पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा झाला नाही तर पाणी बिल का भरायचे, असा पवित्रा घेतला होता.

त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परंतु ही शासकीय थकबाकी आहे, त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास विलंब करू नये, तसे न झाल्यास नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा ग्राम विकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी दिला होता. त्यामुळे सोमवार (ता.१९) नंतर काय कारवाई होते याकडे लासलगावकरांचे लक्ष लागून आहे.

''सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलापैकी १७ लाख रुपयांचे बिल अदा केलेले आहे. महावितरण कंपनीला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केलेली आहे. मात्र महावितरणाकडून संपूर्ण थकीत बिल भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.''-ग्रामसेवक -लिंगराज जंगम,लासलगाव

''या संदर्भात अभियंता अधीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीज कनेक्शन जोडले जाणार नाही. या संदर्भात सोळा गाव पाणीपुरवठा समितीला वारंवार सूचना देऊन ही ही वेळ येऊ घातली आहे.''- ज्ञानदेव पेडालकर, अधीक्षक अभियंता, नाशिक

''लासलगाव शहराचे पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटेना. कधी पाइपलाइन तुटते तर कधी वीज कनेक्शन तोडण्यात येते या भोंगळ कारभाराने नागरिक मात्र त्रस्त आहेत. गावचा कारभारी निवडीपर्यंत पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय अशी भीती आहे.''- त्रस्त नागरिक, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT