thermal power plant esakal
नाशिक

Nashik News : या महिनाअखेर ‘शहा’चे वीजकेंद्र कार्यान्वित होणार...

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : शहा (ता. सिन्नर) येथील १३२ केव्ही वीज उपकेंद्राचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. शिल्लक कामे १५ दिवसात मार्गी लावून २५ डिसेंबरपर्यंत वीजकेंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती महापारेषणच्या अधिकाऱ्‍यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह सिन्नर तालुक्यातील शेतकरी यांना दिली.

बैठकीत आमदार कोकाटे यांनी वीज प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत विंचुरी दळवी, आडवाडी येथील वीज उपकेंद्रांची कामे तातडीने सुरु करून येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण करा. शहा वीज केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करा. १ कोटी ३१ लाख रुपयांचे २२ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजुरीसाठी तत्काळ पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठवा. कुठलेही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका.

इगतपुरी तालुक्यातील साकूर व सिन्नर तालुक्यातील वावी लाइनवरील २४ ट्रान्सफॉर्मर तत्काळ मंजुरीसाठी सादर करण्यात यावेत. ग्रामपंचायत स्तरावरील ४० ट्रान्सफॉर्मर मंजूर असून त्याच्याही निविदा प्रक्रीया पूर्ण करा. १९ ट्रान्सफॉर्मर मंजूर असून त्याची वर्कऑर्डर काढा. अशा सूचना केल्या. यावर आडवाडी येथील २२० केव्ही वीज उपकेंद्रासाठी बाभळेश्वर येथून वीजवाहिनी काम झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

वीजप्रश्न अतिशय गंभीर असून सामान्य लोक, शेतकरी वारंवार आपल्याकडे पाठपुरावा करतात. मात्र एकाच कामासाठी पंधरा चकरा माराव्या लागत असतील. तर ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, मुख्य अभियंता कुमटेकर, अधीक्षक अभियंता पडळकर, कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. यावेळी बाळासाहेब भोर, श्रीराम गवळी, दुलाजी थोरात, आनंदा कांदळकर, श्री. दळवी, श्री. अण्णासाहेब महानुभाव, अनिल वाजे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन जखमी, दोन ठार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT