On the occasion of his son's marriage, Nana Devere returned the dowry taken in marriage to his father-in-law Somnath Shewale through a check to his relatives and grooms. esakal
नाशिक

Nashik News : जावयाने 28 वर्षांनंतर हुंडा केला परत; आदर्श उपक्रमांची सर्वत्र चर्चा

Nashik : ‘घर पाहावे बांधून अन्‌ लग्न पाहावे करून’, अशी जुनी म्हण आहे. विविध समाजामध्ये विवाहाच्या अनेक अनिष्ट चालीरीती व परंपरा आहेत.

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘घर पाहावे बांधून अन्‌ लग्न पाहावे करून’, अशी जुनी म्हण आहे. विविध समाजामध्ये विवाहाच्या अनेक अनिष्ट चालीरीती व परंपरा आहेत. हुंडा ही त्यातीलच एक प्रथा आहे. हुंडा, ( dowry ) लग्नातील बडेजाव व मानपान करताना वधूच्या पित्याचे कंबरडे मोडते. परिस्थिती जेमतेम असल्यास कर्जाचा डोंगर उभा राहातो. (Son in law return dowry )

मराठा समाजात अद्यापही ही प्रथा व विवाहातील अवाढव्य खर्च चर्चेचा विषय असतो. शहरातील एंडाईत मळा भागातील एका जावयाने आपल्या सासऱ्याला २८ वर्षांनंतर लग्नाचा हुंडा परत करून आदर्श निर्माण केला आहे. मुलाच्या विवाहाचा मुहूर्त साधून जावयाने धनादेशाद्वारे परत केलेल्या या हुंड्याची व आदर्श उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

एंडाईत मळा भागातील रहिवासी व नाशिक जिल्हा न्यायालयातील बेलिफ नाना देवरे यांचा देवजीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील सोमनाथ रामचंद्र शेवाळे यांची कन्या निशा हिच्याशी ९ मार्च १९९६ ला विवाह झाला. त्यांची इच्छा नसताना सासऱ्याने दागिने व लग्न खर्चासाठी ५४ हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते.

नाना देवरे यांचा संगणक अभियंता असलेला मुलगा प्रफुल्ल याचा विवाह संगणक अभियंता वधू अंजोर हिच्याशी ४ फेब्रुवारी २०२४ ला झाला. मुलाच्या विवाहात श्री. देवरे यांनी कुठलाही हुंडा घेतला नाही. ही प्रथा बंद व्हावी, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. त्यांच्या मुलाला अंजोरच्या वडिलांनी लॉकेट, अंगठी, ब्रेसलेट असे पाच तोळ्यांपेक्षा अधिक दागिने भेट स्वरूपात दिले होते.

देवरे कुटुंबाने त्यास विनम्रपणे नकार देत शगुनच्या स्वरूपात अवघे ५०१ रुपये स्वीकारत प्रफुल्लने त्याला केलेले सर्व दागिने परत केले. हाच मुहूर्त साधून नाना देवरे यांनी स्वत:च्या लग्नात घेतलेला ५४ हजार रुपये हुंड्याची रक्कम सर्व नातेवाईक व वऱ्हाडी मंडळींच्या समक्ष आपले सासरे सोमनाथ शेवाळे यांना धनादेशाद्वारे परत केले.

श्री. शेवाळे यांनी बँकेत भरलेला धनादेश आज वटल्यानंतर या आदर्श उपक्रमाची चर्चा झाली. देवरे कुटुंबीयांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. मी न्यायालयात बेलिफ आहे. न्यायालयात अनेक कौटुंबिक वाद-विवाद येत असतात. यात विवाहितेच्या छळाचे गुन्हेही असतात. प्रामुख्याने या तक्रारींना हुंडा, मानपान व लग्नातील खर्च, त्यानंतर होणारी विविध वस्तूंची मागणी या बाबी कारणीभूत असतात. यामुळे सुखी संसाराला दृष्ट लागते.

''आपण हुंडा घेत नसताना सासऱ्यांनी दागिने व लग्न खर्चासाठी ५४ हजारांचा हुंडा दिला होता, त्याचे शल्य होते. यामुळे मुलाच्या विवाहाचा मुहूर्त साधून सर्वांसमक्ष हुंड्याची रक्कम धनादेशाद्वारे परत केली. काळानुरुप अनिष्ट रूढी, परंपरा बंद होणे आवश्‍यक आहे.''- नाना देवरे, बेलिफ, नाशिक जिल्हा न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT