nashik esakal
नाशिक

Heat Stroke: नाशिकमध्ये उन्हाचा कहर! उष्माघातामुळे अग्निवीर हर्षल ठाकरेचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील हर्षल ठाकरे या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू

रुपेश नामदास

नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिकमधील आर्टिरली सेंटरमध्ये अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असताना धुळे जिल्ह्यातील हर्षल ठाकरे या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात तापमाण प्रचंड वाढलं आहे, तसेच गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहिला मिळत आहे, तब्बल ३९ डिग्री पर्यंत तापमाण पोहचलं आहे.

याच कालावधीमध्ये अग्निवीराचे प्रशिक्षण घेत असताना हर्षल ठाकरे या जवानाला शुक्रवारी त्रास जाणवत होता. हर्षलला उपचारासाठी आर्टिरलीच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या मृत्यूची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा उष्माघाताने 11 जण दगावले

नवी मुंबईच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक एकत्र आले होते. मात्र उष्माघातामुळे 11 श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र राज्यातील विरोधी पक्षाने सरकारवर आरोप केला होता की, उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे, मात्र सरकार ही सख्या लपवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT