Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प.च्या 4 संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Nashik ZP : परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता. १७) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांच्या झालेल्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (ता. १७) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला. ()

हा निकाल जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून ५ ऑगस्ट २०२३ ला एकूण २० संवर्गामधील एक हजार ३८ रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार १५ संवर्गाकरिता ऑनलाइन परीक्षा झाली.

कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्यसेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पाच संवर्गांच्या परीक्षा नियोजित असून, शासनाच्या मान्यतेनुसार त्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी व विस्तार अधिकारी (शिक्षण) या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT