Nashik Night Garbage disposal facility Govindnagar area, Nashik Latest News Updates sakal
नाशिक

नाशिक : गोविंदनगर भागात रात्रीची 'घंटागाडी'

शहरातील पहिला उपक्रम; ठिकठिकाणी स्वागत

सकाळ वृत्तसेवा

सिडको : रहिवाशांच्या सोयीसाठी महापालिकेने गुरुवार पासून कर्मयोगीनगर, गोविंदनगर भागात रात्रीची घंटागाडी सुरू केली आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांचे या वेळी स्वागत करण्यात आले. यामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. शिवसेना आणि सत्कार्य फाउंडेशनने महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. घंटागाडीचे ठिकठिकाणी रहिवाशांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रहिवासी भागात नाशिक शहरातील हा पहिलाच उपक्रम आहे. दिवसाची घंटागाडी नियमित सुरू राहणार आहे. (Nashik Latest News Updates)

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, उंटवाडी, बडदेनगर, जुने सिडको या भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळतात. कर्मचाऱ्‍यांनी वेळोवेळी कचरा उचलूनही येथे कचरा टाकला जातो. सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्या रहिवाशांना दिवसा सकाळी दहानंतर व दुपारी येणाऱ्‍या घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही. रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रात्रीची घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिकेने प्रभाग २४ मध्ये दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत घंटागाडी सेवा सुरू केली आहे. नागरिकांनी आयुक्तांचे विशेष आभार मानले.

या वेळी बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगीता देशमुख, वंदना पाटील, शीतल गवळी, सुलोचना पांडव, चित्रा रौंदळ, अपर्णा खोत, उज्ज्वला सोनजे, विनोद पोळ, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, बापूराव पाटील, हिरालाल ठाकूर, दिलीप खोडके, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, सुदाम निकम, भालचंद्र पारखे, मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, माया पुजारी, अनिता निकम, मंगला देवरे, मंगल खैरनार, संगीता दोडके, भारती देशमुख, अशोक पाटील, प्रदीप जाधव, राधाकृष्ण नटाळ, प्रल्हाद सोनार, प्रदीप पवार, अशोक देवरे, दिलीप निकम, राजेंद्र विभूते, राजेंद्र कारभारी, शकुंतला कुलकर्णी, दीपा सिंग, शीतल जैन, लता काळे, ज्योत्स्ना जाधव, स्मिता गाढवे, रूपाली मुसळे, विजया पाटील, कलावती पाटील, निशा ठाकरे, आरती देशमुख, साधना म्हस्के आदींसह रहिवासी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT