NMC Hoarding esakal
नाशिक

NMC News : मराठी पाट्याबद्दल महापालिका प्रशासनाची अनास्था! दंडात्मक कारवाई शून्य

Nashik News : मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमध्ये मेळावा होत असताना मराठी पाट्यासंदर्भात पक्षाकडून कुठले ठोस आंदोलन तर झाले नाही.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमध्ये मेळावा होत असताना मराठी पाट्यासंदर्भात पक्षाकडून कुठले ठोस आंदोलन तर झाले नाही. शिवाय महापालिका प्रशासनदेखील याप्रश्‍नी बेफिकीर असल्याचे समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि कामगार आयुक्त कार्यालयाने महापालिकेला मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे पत्र देऊनही शहरात इंग्रजी पाट्याबरोबर मराठी पाट्या दिसत नसल्याने महापालिकेचीदेखील मराठीबद्दल अनास्था दिसून येत आहे. (nashik NMC administration disinterest in Marathi board marathi news)

सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल एका याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने इंग्रजी बरोबरच मराठी पाट्या अनिवार्य केल्या आहेत. त्यासाठी २५ नोव्हेंबर २०२३ मुदत मराठी पाट्या लावण्यासाठी दिली होती. या कालावधीत मराठी पाट्या न लागल्यास त्या आस्थापनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडून २५ नोव्हेंबर नंतर शहरातील ६५ हजार व्यावसायिक आस्थापनांना नोटीस पाठवून मराठी पाट्या लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र दंडात्मक कारवाईचे अधिकार नसल्याने कामगार उपायुक्त कार्यालयाकडे मनपा प्रशासनाने मार्गदर्शन मागविले होते. त्यावर कामगार उपायुक्त कार्यालयाने पंधरा दिवसातच दंडात्मक कारवाईचे अधिकार देखील महापालिकेला असल्याचे कळविले. (Latest Marathi News)

कागदच गहाळ

तीन महिने उलटूनही महापालिकेने कारवाई केली नाही. उलट कामगार उपायुक्त कार्यालयाने दिलेला अधिकाराचा कागदच गहाळ झाल्याचीदेखील बाब समोर आली. त्यानंतर उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी महापालिका मुख्यालयात आले. व त्यांनी अधिकार महापालिकेला असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाच्या वतीने कारवाई होणे अपेक्षित असताना अद्यापही एकाही व्यावसायिकांवर कारवाई झालेली नाही.

चर्चेचा मुद्दा

मराठीच्या विषयावर आक्रमक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमध्ये मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गुरुवार (ता.७) पासून कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आतापर्यंत कारवाईचे कागद देखील हलला नाही. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर फारसे गांभीर्याने घेतले नाही. एक दिवस प्रसिद्धीसाठी आंदोलन केले. त्यानंतर मराठीच्या मुद्द्याकडे देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT