Simhastha Kumbh Mela  esakal
नाशिक

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणाचे आव्हान; 2 कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज

Simhastha Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पाडणार आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात दोन कोटीहून अधिक भाविक व पर्यटक येतील, असा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

Simhastha Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पाडणार आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात दोन कोटीहून अधिक भाविक व पर्यटक येतील, असा अंदाज आहे. त्यातही पर्वणीच्या दिवशी सर्वाधिक गर्दी होणार असल्याने गोदा घाटाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर गर्दीचे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्याअनुषंगाने प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन कसे करण्यात आले, यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. (nashik nmc appeal Challenge of crowd control in Simhastha Kumbh Mela )

दरम्यान गर्दीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर असताना महापालिकेने दाखविलेला रस सिंहस्थ कामांमध्ये घुसखोरी करणारा ठरताना दिसत आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता प्रयागराज येथे सल्लागार म्हणून काम केलेल्या यंग फ्रेंड्स असोसिएशनचे मार्गदर्शन घेण्यात आले.

महापालिकेत या संदर्भात नुकतेच ऑनलाइन सादरीकरण झाले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी आदी उपस्थित होते. संयुक्त कुंभमेळ्यासाठी शासन व महापालिकेने नियोजन केले आहे. महापालिकेने जवळपास ११ हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.

यामध्ये साधूग्रामसाठी भूसंपादन करावे लागणार असून त्यासाठी जवळपास तीन कोटींची तरतूद केली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य ४२ विभागांकडून खर्चाचा आराखडा घेऊन शासनाला एकत्रित अहवाल सादर करण्यात आला आहे. दुसरीकडे शासनाने राज्य शासन पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना केली आहे.  (latest marathi news)

माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवरील समितीचे मुख्य कामकाज आहे. शासन व महापालिकेशी सुसंवाद साधण्याचे काम या माध्यमातून होईल. तसेच शासनाकडून कुंभमेळ्यासाठी जो काही निधी येईल तो जिल्हा पातळीवर गठित करण्यात आलेल्या समितीमार्फत खर्च केला जाणार आहे.

तीन पर्वण्यांच्या दिवशी सर्वाधिक गर्दी

कुंभमेळ्याचे नियोजन करताना गर्दी व स्वच्छता ही दोन मुख्य भाग आहेत. दोन कोटी भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यातही तीन पर्वण्यांच्या दिवशी सर्वाधिक गर्दी होणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रयागराज येथील फॉर्म्युला अमलात आणला जाणार आहे. या अनुषंगाने प्रयागराज येथे केलेल्या कुंभमेळा नियोजनाचे सादरीकरण केले.

स्वच्छतेला महत्त्व

उज्जैन, हरिद्वार व प्रयागराज तसेच नाशिक येथे कुंभमेळा भरतो. नाशिक वगळता अन्य ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. नाशिकमध्ये मात्र त्या उलट परिस्थिती आहे. म्हणून नाशिकमध्ये गर्दीचे नियंत्रण हा महत्त्वाचा भाग राहणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर स्वच्छतेचा व आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याचादेखील मुद्दा उपस्थित होणार असल्याने त्याअनुषंगाने नियोजन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

SCROLL FOR NEXT