nmc  esakal
नाशिक

NMC News : महापालिकेचे कामकाज ठप्प; अडीच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

NMC : लोकसभा निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची मागणी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : लोकसभा निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची मागणी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आल्याने पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. टप्प्या-टप्प्याने कर्मचारी वर्ग निवडणूक शाखेकडे वर्ग होईल. त्याशिवाय महापालिकेची वीस वाहनेही निवडणूक कामासाठी मागविले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. (nashik NMC appointment of two thousand employees marathi news)

जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांत निवडणुकीचे काम करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने महापालिकेकडे अडीच हजार कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. मात्र महापालिकेकडेच सद्यस्थितीत कर्मचारी तुटवडा आहे. आर्थिक वर्ष अखेरमुळे पालिकेची अनेक कामे प्रलंबित आहेत. (latest marathi news)

त्यामुळे अडीच हजार कर्मचारी वर्ग झाल्यास पालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. निवडणुकीनिमित्त चार उपायुक्तांची बदली मूळ सेवेत झाली आहे. परिणामी विभाग प्रमुखांच्या जबाबदारीचे विभाजन व जबाबदारीत वाढ झाली आहे. त्यात अडीच हजार कर्मचारी वर्ग होणार असल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे.

यांत्रिकी विभागाकडून वाहन निश्‍चिती

निवडणूक कामासाठी वाहनांची आवश्‍यकता भासणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा निवडणूक शाखेने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून पहिल्या टप्प्‍यात वीस वाहनांची मागणी केली आहे. यांत्रिकी विभागाकडून वाहनांची निश्‍चिती करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यादी पाठविली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT