ncm esakal
नाशिक

NMC News : टीडीआरला आता ‘आरसीसी बॉण्ड’ चा पर्याय धोरणाला महासभेची मंजुरी

NMC : महापालिका हद्दीत भूसंपादन करताना रोख मोबदला, टीडीआरबरोबरच आता प्रशासनाने रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट (आरसीसी) योजना लागू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिका हद्दीत भूसंपादन करताना रोख मोबदला, टीडीआरबरोबरच आता प्रशासनाने रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट (आरसीसी) योजना लागू केली आहे. आरसीसी धोरणात महापालिकेकडून जमिनीच्या बदल्यात रेडीरेकनरच्या दुप्पट दराचा बॉण्ड घेतला जाणार आहे. बिल्डर्सला प्रकल्पासाठी विकास शुल्क भरण्याऐवजी बॉण्ड विक्री करून त्याचे परस्पर रोखीकरण करण्याचा पर्याय यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. (nashik NMC General Assembly approves alternative policy of RCC Bond to TDR marathi news)

महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात विविध कारणांसाठी ५४० आरक्षणे निश्‍चित करण्यात आली आहे. आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला जवळपास पाच हजार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. एकीकृत नियंत्रण विकास नियमावलीत एफएसआयचे प्रमाण वाढविले आहे. (latest marathi news)

टीडीआर स्वरुपातील मोबदला घेण्यास कमी प्रतिसाद असल्याने आरसीसी बॉण्ड त्यासाठी पर्याय ठरणार आहे.अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी तरतूद करण्यात आलेल्या एकूण रक्कमेच्या पन्नास टक्के रक्कम आरसीसी सर्टिफिकेटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. चार वर्षांत सर्टिफिकेटची विक्री करून मोबदला मिळविणे शक्य होणार आहे.

''भूसंपादनासाठी रिझर्वेशन क्रेडिट सर्टिफिकेट धोरण मंजूर केले आहे. प्राधान्यक्रमाचा निर्णय मात्र अतिरिक्त आयुक्तांची समिती घेईल.''-डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT