Land acquisition esakal
नाशिक

Nashik NMC News : भूसंपादनाचा चेंडू उपसंचालकांच्या कोर्टात!

Latest Nashik News : उपसंचालक कार्यालयाकडूनच भूसंपादन झाल्याचे सांगताना या विभागाकडून माहिती घेऊन सांगता येईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik NMC News : महापालिका प्रशासनाने ५५ कोटी रुपयांच्या भूसंपादन प्रकरणावरून पुन्हा टोलवाटोलवी केली असून नगररचना विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडे चेंडू टोलवला आहे. उपसंचालक कार्यालयाकडूनच भूसंपादन झाल्याचे सांगताना या विभागाकडून माहिती घेऊन सांगता येईल, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले. (NMC Land acquisition)

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसतानादेखील प्रशासनाने प्राधान्यक्रम बाजूला ठेवून ५५ कोटी रुपयांचे बेकायदेशीर भूसंपादन केले. चुकीच्या पद्धतीने झालेल्या भूसंपादनावरून महापालिका आयुक्तांना भाजप आमदारांनी धारेवर धरले. मात्र अद्यापपर्यंत आयुक्तांकडून भूसंपादनासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

महापालिकेला व्याज भरावयाचे एकूण २७१ प्रकरणे आहेत. त्यातही प्राधान्यक्रम आवश्यक असताना विशिष्ट ११ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. अकरा प्रकरणे मंजूर करताना उपसंचालक हर्षल बाविस्कर यांनी महापालिका आयुक्त करंजकर यांच्या संमतीने प्रस्ताव मंजूर झाल्याचा दावा केला. मात्र, आयुक्तांनी प्राधान्यक्रमातील वरच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना का डावलेले, यासंदर्भात उपसंचालक कार्यालयाकडे माहिती असून त्यांच्याकडून माहिती घेऊन स्पष्टीकरण देवू अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

November Planetary Changes: नोव्हेंबरमध्ये ४ ग्रहांची चाल बदलणार! मेष आणि वृश्चिकसह 'या' राशींच्या लोकांना होईल मोठा लाभ

MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा

बापरे! पंजाबी गायक चन्नी नट्टनच्या घरावर गोळीबार! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

पतीला प्रेयसीसह रंगेहात पकडलं, संतापलेल्या बायकोनं रस्त्यावरच चपलांनी हाणलं, प्रेयसी लॉजमधून पसार; VIDEO तुफान व्हायरल

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT